पालघर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शुभेच्छा देऊन योग एक दिवस न करता दररोज करा व निरोगी रहा असा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी, लायन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र) संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो यामुळे त्यांना प्रेरणा मिळते नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित साधत जिल्ह्यातील साधारण अडीच ते तीन हजार पेक्षा अधिक शाळांमधील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी योग दिना मध्ये उत्साहात सहभाग घेतला . असे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर व प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यामधील शाळा,महाविद्यालय विविध कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या पालकांना सुद्धा योगासनाचे धडे देतील हा या मागच्या उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *