ठाणे : सध्या ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकी पूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालेले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजनीतीमय वादळात स्व. वसंत डावखरे यांचे पुत्र प्रबोध डावखरे अडकले. वसंतनिती अंगवळणी पडलेल्या प्रबोध डावखरे यांच्यावर राजकीय आरोप होऊ लागले. त्यावर प्रबोध डावखरे म्हणाले राजकीय नेत्यांशी संबंध जपवणूक करणे राजनीती नाही, वसंत निती असल्याचे त्यांनी संगितले.
स्व. वसंत डावखरे यांच एक मुलगा राजकरणात असून निरंजन डावखरे हे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दूसरा मुलगा प्रबोध डावखरे यांचा वसंत डावखरे यांच्या कारकीर्दीपासून राजकारणापासून दूर आहे. दरम्यान प्रत्येक राजकीय नेत्यांशी त्यांचे वसंतनिती नुसार व्यक्तीगत संबंध आहेत. मात्र पदवीधर निवडणुकीत प्रबोध डावखरे यांचा भाऊ निरंजन डावखरे रिंगणात असतानाच प्रबोध डावखरे हे खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत असताना राजकरणात आता प्रबोध डावखरे सक्रिय झाल्याचा यांच्यावर आरोप होत आहेत. निरंजन डावखरे भाजपच्या तिकीटावर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित असल्याने प्रबोध डावखरे त्यांच्या विजयासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे काही फोटो, चर्चा आणि आरोप झाले. यावर प्रबोध डावखरे यांनी संगितले. निरंजन डावखरे माझा भाऊ असला तरीही त्याने केलेल्या कामामुळे त्याचा विजय होईल. पण मी त्याच्या मदतीसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांशी भेटलेलो नाही. तर माझे व्यक्तीगत राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. वडील ज्या प्रमाणे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवीत होते. त्याच प्रमाणे निरंजन याने राजकरणात वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकीत वाटचाल करीत आहे. तर मी व्यावसायिक आहे. त्यामुळे सध्याच्या राजकरण आणि राजनीतीशी कुठलाही संबंध नाही. म्हणून मी पूर्वीपासून राजकारणापासून दूर आहे. भविष्यात वेळ भासल्यास विचार होईल पण तूर्तास माझ्या राजकीय नेत्यांशी भेटी या राजनीती नाही, तर वसंतनिती असल्याचा खुलासा प्रबोध डावखरे यांनी सांगत वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकीत राजकीय नेत्यांशी व्यक्तीगत संबंध जपत असल्याचे संगितले.
