कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला. ते बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत बोलत होते. यावेळी संघटनेची नव्याने बांधणी करू, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने शेतकर्यांवर वरवंटा फिरवू नये. तातडीने एफआरपी व भूमिअधिग्रहण कायद्यातील केलेली दुरूस्ती मागे घ्यावी. दूध उत्पादकांची लूट सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी होऊ लागले आहेत. राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ७ रूपये अनुदान खात्यावर वर्ग करावे, अन्यथा १० जुलै रोजी १ दिवसाचे दूध बंद आंदोलन करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *