एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा

मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य लढतीत मुंबई उपनगरच्या जितेश कदमने विश्व् विजेत्या मुंबई उपनगरच्याच संदीप दिवेला तीन सेटपर्यंत कडवी लढत दिली. पहिला सेट २३-१० असा जिंकून जितेशने आघाडी घेतली होती. परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावर संदीपने दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे २५-५, १९-७ असा जिंकून आगेकूच केली. तर महिलांच्या उप उपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने सिंधुदुर्गच्या दीक्षा चव्हाणवर तीन सेटनंतर २५-१, १६-२१, २१-१२ असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.

सागर वाघमारे ( पुणे ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) १८-११, १४-११
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि संजय मांडे ( मुंबई ) २५-१३, २५-१०
महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि पंकज पवार ( मुंबई ) २४-११, १५-११
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.
निलम घोडके ( मुंबई ) वि वि श्रुती सोनावणे ( पालघर ) १९-१५, २५-१०
अंबिका हरिथ ( मुंबई ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २५-२२, १५-२२, २५-४
ऐशा साजिद खान ( मुंबई ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २५-०, २३-९, २०-१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *