२ जुलैला होणार वाटप – आनंद परांजपे
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले शिबीरात १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या दाखले वाटप शिबीराचा विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केले जाईल, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २२ जून २०२४ व रविवारी, २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा, विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात सर्वे नागरिकांना या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे ठाणे शहर (जिल्हा) कार्यकारिणी सदस्य, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी, विद्यार्थी पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटल / सेल / विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
