ठाणे : सर्व्हिस रोड गुरुद्वारा पदचारी पुलाजवळ ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या पुला वरून नागरिक ये-जा करू शकत नाहीत. रहदारीच्या रस्त्यावरून लोकांना रस्ता क्रॉस करावा लागत आहे, यामुळे अपघाताची शक्यताही खूप वाढली असून लोखंडी अडगळ काढण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.
सुचिता कॉ-ऑप,सोस, लिमिटेड , C.T. S No . ३४०/३४१/३४२/३४३ आणि ३४४ , टीका नं.१० , व्हिलेज नौपाडा ,ठाणे. येथे, सुचिता कॉ-ऑप,सोस चे री-डेव्हलोपमेंट चे काम चालू आहे. जवळील सर्व्हिस रोड ला लागून पब्लिक फ्लाय ओव्हर ब्रिज आहे . याच ब्रिज वरून लोक ये-जा करतात , परंतु ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या ब्रिज वरून लोक ये-जा करू शकत नसल्याचे … यांनी सांगितले
सर्व्हिस रोड वर हे लोखंडी सामान असल्यामुळे आता पाऊस चालू झाला आहे तर तेथे पाणी साचते आहे आणि त्यामुळे तेथे खूप मच्छर होत आहेत त्यामुळे पब्लिक मध्ये आजारपण वाढण्याची शक्यता वाढली आहे.
बिल्डरच्या मनमानी कारभारामुळे ठाणेकरांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व्हिस रोड वरील सामान काढून टाकावे.
सर्विस रोड वरील सामान हटवून लोकांना येण्या-जाण्यासाठी सर्विस रोड ताबडतोब खुला करून द्यावा अशी रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी आहे . जर हि कारवाई तात्काळ झाली नाही तर रिपब्लिकन बहुजन सेनाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
०००००
