कर्जत : २३ जून रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते मतदारसंघाच्या गावभेट दौऱ्यावर आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधून ते त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. याचाच परिणाम आता पक्षसंघटना वाढीमध्ये सुद्धा दिसुन येत आहे.*
शनिवारी आणि रविवारी सुधाकर घारे यांचा उमरोली जिल्हा परिषद वार्डाचा गावभेट दौरा सुरु होता. या व्यस्त नियोजनातसुद्धा त्यांना रविवारी दुपारी शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यावा लागला. यावेळी तुंगी आणि बोरगाव येथिल शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विधानसभेची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु झालेली असताना घारे मात्र आपल्या लोकप्रियतेच्या शिगेला पोहोचलेले पहायला मिळत आहेत. यावेळी लोकांशी संवाद साधताना सुधाकर भाऊ घारे यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. यासोबत पक्षात नव्याने सहभागी होणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. दरम्यान काही पदनियुक्त्यादेखील यावेळी करण्यात आल्या. यावळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
