राजीव चंदने
मुरबाड : बांधकाम मेस्त्री चे काम करत असताना परांची वरुन पडल्याने एका पायाने अपंगत्व आलेल्या रमेश यल्लप्पा याला चालताना दोन कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो त्याने खचुन न जाता किंवा रस्त्यावर भीक न मागता आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी मुरबाड शहरात रस्त्यावर पडलेले भंगार कचरा वेचुन तो आपल्या परिवाराचा आधार बनला असल्याने त्याचे जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रशियाने धाडधकट असलेला रमेश यल्लप्पा हा मुळचा कर्नाटकचा वयाचे विस पंचवीस वर्षाने तो मुंबईत आला .तेथे कोणत्याही प्रकारचे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने तो बांधकाम कामगार बनला त्यावेळी त्याला मिळणारे पन्नास साठ रुपये रोजंदारी वर आपला उदरनिर्वाह करु लागला.परिणामी वेठबिगारी करत असताना तो मेस्त्री झाला.मेस्री कामातून मिळणाऱ्या अधिक कमाई ने त्याने गावाकडील मुली बरोबर लग्न केले.आणि तिनं आपत्यांची आपल्या कुटुंबात भर पडली.पत्नीची मिळणारी साथ यामुळे कमाईत भर पडली असल्याने तो बांधकामांचा कंत्राटदार बनला.त्यामुळे तीन मुलांचे शिक्षण व परिवाराची जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळत होता.हि जबाबदारी पार पाडत असताना परांचीवर जोखमीचे काम करत असताना तो खाली पडला आणि त्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला.त्याला चालताना दोन कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो.त्यामुळे त्याचा रोजगार हिरावला गेला असला तो खचला नाही.त्याने पाठीवर प्लास्टिक ची गोणी बांधत दोन कुबड्या घेऊन बाहेर पडत आहे व रस्त्यावर पडलेली प्लास्टिक ची रिकामी बाटली, पिशवी, पुठ्ठे व इतर भंगार कचरा वेचुन दररोज शंभर ते दोनशे रुपये कमवुन आपल्या परिवाराचा आधार बनला आहे.
कोट
मी तरुण वयापासुन काबाडकष्ट करत आलो आहे कर्नाटक मधुन मुंबईत आल्यावर मी उपाशी पोटी दिवस काढले.परंतु कोणाकडे भीक मागितली नाही.त्यामुळे मला जरी अपंगत्व आले असले तरी कोणाकडे भीक मागण्यापेक्षा अंगमेहनत करून मी जीवन जगत आहे.- रमेश यल्लप्पा.मुरबाड.
०००००
