शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी चुरस

मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा निवडणूकीसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघासाठी आज बुधवार दिनांक २६ जुलैला मतदान होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. १ जुलैला मतमोजणी होईल.

मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं प्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी ज. मो. अभ्यंकर ज्यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. तर कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून स्वतः कपिल पाटील यांनी उमेदवारी न घेता  शिक्षक भारतीतील आपले सहकारी सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली असून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दुसरीकडे  शिवसेना शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा धर्म न पाळता शिंदे यांनी शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  शिवाजी नलावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि तेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पाच  जणांच्या लढतीमध्ये बाजी कोण मारतं याकडे लक्ष असेल.

विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा अनिल परब यांनाच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी आधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता अनिल परब यांना भाजपच्या किरण शेलार यांचं आव्हान असणार आहे.

कोकण पदवीधर म्हणजे भाजपचा पारंपारिक मतदारसंघ. अशातच भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आल्यानंतर मनसेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. सध्या तिथून निरंजन डावखरे आमदार होते. अशातच त्यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

निरंजन डावखरे यांना  आव्हान असेल काँग्रेसचे उमेदवार  रमेश कीर यांचा. शिवसेना ठाकरे गटाचे  उमेदवार किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत  आघाडी धर्म पाळला आणि रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील

मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी 

अनिल परब – शिवसेना ठाकरे गट

किरण शेलार – भाजप

मुंबई शिक्षक मतदार संघ 

ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट

शिवनाथ दराडे : भाजप

सुभाष मोरे : शिक्षक भारती

शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार

शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

 

कोकण पदवीधर मतदारसंघ

निरंजन डावखरे : भाजप

रमेश कीर : काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *