ठाणे : ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड व ठाणे महानगरपालिका प्रदुषण विभागाच्यावतीने सदरची कारवाई सुरू असून आज माजिवडा मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 9.5 किलोक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत एकूण 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
तर सोमवारी (24/6/2024) वर्तकनगर प्रभागसमितीअंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तर विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16500/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
या दोन्ही कारवाईत एकूण 22 किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन 39000 हजार रु. इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकच्या प्रदुषण विभागाने दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमितीअंतर्गत प्रतिबंधीत प्लॅस्टिकबंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.
00000
बुध्दिबळ दिनानिमित्त २० जुलैपासून आयडियल बुध्दिबळ महोत्सव
मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत.
शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
