मुंबई :  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य सिनियर (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद -निवडचाचणी स्पर्धा – २०२४, २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१ वडाळा रेल्वे स्टेशन व किडवाई नगर पोलीस स्टेशन जवळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम प्रवेशिका स्वीकारण्याची तारीख २७ जून आहे. या स्पर्धेत सिनियर गटात छत्रपती पुरस्कार विजेते साहिल उतेकर, श्रेया बोर्डवेकर, ऋतुराज पाटील (सर्व मुंबई), निलेश गराटे, राष्ट्रीय विजेती हर्षदा गोळे, राष्ट्रीय पदक विजेती सेजल मकवाना ( सर्व मुंबई उपनगर), प्रशांत दुमडे (कोल्हापूर), अक्षया शेडगे (ठाणे),   अमृता भगत (रायगड) आणि नवी मुंबईचा ज्युनिअर गटातील जागतिक विजेता व्यंकटेश कोणार हे नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
या राज्य स्पर्धेतून २० ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कोलकत्ता- पश्चिम बंगाल या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धेच्या  प्रवेशिका maharashtrapowerlifting 2020@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात तसेच लिखित स्वरूपात स्पर्धेच्या दरम्यान संजय सरदेसाई यांच्याकडे सुपूर्द करावी. अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक सूर्यकांत गर्दे ९८६९७३६७११, प्रशांत सरदेसाई ९८२०३७०४९७ व जितेंद्र यादव ९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क करावा.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *