मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘आयडॉल’मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’च्या चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी या विभागीय केंद्रांवर प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तसेच, पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे. ‘ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घ्यावा’, असे आवाहन ‘आयडॉल’चे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी केले आहे.
प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम., बी.एस्सी. , एम. ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, जनसंपर्क), एम. ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम. कॉम. , एमएमएस, एम.एस. सी. , एम. एस. सी. (संगणकशास्त्र), एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू होतील.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *