10 हजार नागरिक होणार सहभागी

 

 

डोंबिवली, : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुप यांच्या वतीने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत 4 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ चे  आयोजन करण्यात आले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी हा पुढाकार घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली करांसाठी आरोग्यदायी मैत्रीची धाव म्हणजेच ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत बुधवारी मंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन अशा टप्प्यांत होणार आहे.
1.6 किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. यात 6 वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप 500 मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली 9 वर्ष डोंबिवली कल्याण मध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे. ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
5 किमी ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात 10 आणि 21 हजार मी सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील. फन रन धाव 1 मैल ची धावरनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल.
10 आणि 21 हजार मी या दोन श्रेणी कालबध्द शर्यती आयोजित केल्या आहेत. भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *