समता, बंधुता, मानवता यांची स्वकृतीतून प्रचिती देत सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
