मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथे सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची  नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान या वातानुकूलित केंद्रात खेळाडूंना सराव करता येणार आहे. शिवाय दर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत राज्यातील युवा मुला मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून सरावासाठी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० खेळाडूंची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. असोसिएशनने राज्यातील राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय विजेते तसेच छत्रपती पुरस्कारार्थी कॅरम खेळाडूंना या केंद्रात मोफत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दिनांक २९ जुन २०२४ पर्यंत संजय बर्वे भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ / ९९६९६०६०८२ यांच्याशी संपर्क साधावा.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *