खडसेंचा अजित पवरांना सवाल
मुंबई : भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक आहेत. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला डिवचले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असा टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे, भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि अतुल भातखळकर यांच्या चर्चेचा व्हिडिओ नुकताच समोर आला. यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसळ यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंनी भेट घेतल्याने एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.