माथेरान : माथेरान पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर, माथेरान या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित करून उपस्थित विद्यार्थी यांना सपोनी श्री.अनिल सोनोने यांनी मार्गदर्शन  केले. तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली.
सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थ विषयी उत्सुकता व त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता हे प्रकार वाढत आहेत त्यातूनच अनेक गैरप्रकार वाढत आहेत,नुकतेच पुणे ह्या सुसंस्कृत शहरामध्ये अमली पदार्थांनमुळे वाढलेली अपघातांची व गुन्ह्याची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांना अशा व्यासनाविषयी जागरूकता दाखवून त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असल्याने हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन करण्यापासून  जनजागृती करण्यासाठी या वेळी आव्हाहन करतानाच अश्या समाज कंटकान पासून सावध राहण्याचे सांगण्यात आले. यावेळी सहा. फौजदार सी के पाटील, गोपनीय अंमलदार दामोदर खतेले हे उपस्थित होते. सदर वेळी साधारण 70 विद्यार्थी उपस्थित होते व त्यांनी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *