नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली विविध ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.
अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम नेरूळ सेक्टर 15 येथील फकिरा मार्केटमध्ये सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश वाघुळदे यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षकांसमवेत मार्केटमधील व्यापारी व नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी स्वच्छतेविषयीची सामुहिक शपथ घेण्यात आली तसेच प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा व प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणेविषयी आवाहन करण्यात आले. मार्केटची अंतर्गत तसेच बाह्य परिसर सफाई करण्यात आली.
00000