ठाणे : कोपरी पूर्व च्या शिवसेना विधानसभा संघटिका सौं.मालती रमाकांत पाटील ( मा. नगरसेविका ) यांच्या अथांग प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 20 (अ) शांतीनगर कोपरी ठाणे पूर्व येथे नव्याने नूतनीकरण करण्यात येत असलेल्या सुलभ शौचालयाच्या मागील मुख्य ड्रेनेज वाहून नेणारी लाईन चोकअप होऊन नादुरुस्त झाली होती. त्यामुळे शांतीनगर मधील नागरिकांनी नित्यनियमाच्या क्रियेसाठी फार मोठा त्रास होत होता. तसेच शौचालयामध्ये दुर्गंधी सुटून घाणीचे साम्राज्य पसरले होते स्थानिक कार्यकर्ते तसेच काही नागरिकांनी शिवसेनेचे कोपरी संघटक श्री. रमाकांत (दादा) पाटील यांना कळविले असता त्यांनी लगेच सदर ठिकाणी चॅटिंग गाडी पाठवून संबंधित कंत्राटदार – सुवर्णा फायब्रोटेक प्रा. ली. यांना सांगून लगेच चेंबर दुरुस्ती करून तसेच जेटिंग गाडी मागवून साफसफाई करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी शिवसेना विधानसभा संघटिका कोपरी पाचपखाडी सौ. मालती रमाकांत पाटील (मा. नगरसेविका ) व शिवसेना विभाग संघटक ठाणे कोपरी पूर्व श्री. रमाकांत (दादा) पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले.