अशोक गायकवाड

 

 

रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. २५ जुन ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हयातील अधिकाधिक पात्र नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आवाहन केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम २१ (२) अन्वये आगामी कालावधीत ज्या राज्यातील विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यात दि. १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना आयोगाने निर्देश दिले आहेत. या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातर्गत दि.२५ जून ते २४ जुलैदरम्यान मतदान केंद्र स्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी मतदार यादीत नावनोंदणी, नावाबाबत पडताळणी करणे, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे प्रमाणिकरण व सुसूत्रीकरण करणे, मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांना ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणीसाठी किंवा अन्य दुरुस्तीसाठी एन. व्ही.एस.पी., व्होटर हेल्पलाइन अॅप व वोटर पोर्टल या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या कालावधीत ठरवून दिलेल्या शनिवार व रविवार या जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नावनोंदणी शिबिरांचे आयोजन करणेत येईल. अस्पष्ट/अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदारांकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे. आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे व कंट्रोल टेबल अद्यावत करणे, मतदार यादी संदर्भात १ ते ८ फॉर्मेट तयार करणे, दि.१ जुलै या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी तयार करणे याबाबींचा समावेश असल्याची माहिती दिली आहे. तर पुनरिक्षण कार्यक्रमात दि. २५ जुलै रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी करणे. दि. २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत मतदार यादी संदर्भातील दावे म्हणजेच नाव नोंदणी व हरकती स्विकारल्या जातील. दि.१९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढणेत येतील.अंतिम मतदार यादीसाठी भारत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे, सुचना निर्गमित झाल्यानंतर दि. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *