मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे वक्तव करीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला. लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून शाब्दीक चकमक उडाली होती. पवार
लोकसभा निवडणुकीतील निकालानुसार यंदा मविआला विधानसभेत सत्ता मिळेल असे वातावरण राज्या आहे. महाविकास आघाडी निवडणूक एकत्र लढणार असली तरी अजून जागावाटपाच्या कळीच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचा हात वर करत त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं होतं पण आता शरद पवार यांनीच म्हणतात महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असणार आहे असे सांगितल्यामुळे या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निकालात काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस जास्त जागांचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचे चेहरे म्हणून अनेक नावे पुढे आली आहेत. त्यात उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले या नेत्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्रिपदावरूनच 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं होतं. राज्यात मविआचा नवा प्रयोग अस्तित्वात आला होता. आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या तिढा कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.