उल्हासनगर काँग्रेस कमिटीचा ठरावं
उल्हासनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मासिक सभा काँग्रेस कार्यालय नेहरू भवन उल्हासनगर 2 येथे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली. उल्हासनगर शहर हे तीन विधानसभा मतदारसंघांनी जोडले गेले आहे. उल्हासनगर विधानसभा संघ हा स्वतंत्र मतदार संघ असून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात उल्हासनगर शहरातील काही भाग समाविष्ट आहे तर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात उल्हासनगर शहरातील काही भाग समाविष्ट आहे.
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उल्हासनगर शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत आहे . ही मागणी लक्षात घेऊन उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दीपक सोनोने यांनी हा प्रस्ताव मांडला त्याला उल्हासनगर काँग्रेस नागरी सेल अध्यक्ष वामदेव भोयर यांनी अनुमोदन दिले सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
या सभेला साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके. नार्थ ब्लॉग अध्यक्ष नानिक आहुजा. सेंट्रल ब्लॉग अध्यक्ष सुनिल बहरानी. प्रदेश प्रतिनिधी वजीउद्दीन खान. महिला अध्यक्ष मनिषा महाकांळे. विद्यार्थी अध्यक्ष रोहित ओव्हाळ.
शाम मढवी. आसाराम टाक. नारायण गेमनानी. सिंधूताई रामटेके. निलेश जाधव. सामवेल मावची. ईश्वर जग्यासी. मनोहर मनुजा. रजनीकांत शहा. राकेश मिश्रा. तारकेश्वर राय.आबा साठे. आनंद साळवे. संध्या महाकांळे. सुधा जोगळेकर. सुशमा जोगळेकर. आदी उपस्थित होते.
0000