लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची शिवसेनेची मागणी
उल्हासनगर :उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला एका ठेकेदाराने नाल्यालगत खड्डे खोदलेले आहे या खड्ड्यांमध्ये मध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसून येत नाही त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून हे खड्डे मनपा प्रशासनाने त्वरित बुजवावे अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांनी केली आहे.
उल्हासनगर- 2 येथील खेमानी परिसरात मुख्य रस्त्यावर कॅनरा बँकेच्या लागून व रिक्षा स्टँड रुहानी सत्संग समोर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नाल्यालागत दोन मोठे खड्डे खोदण्यात आलेले आहेत. मनपा प्रशासनाने नाले बांधण्याचे काम झा पी या कंपनीला दिले होते तेव्हा या ठेकेदाराने हे खड्डे खोदलेले आहेत असा आरोप ज्ञानेश्वर मरसाळे यांनी केला आहे.
खेमानी, आझाद नगर हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून येथे अनेक रिक्षा स्टँड, शाळा असून अवजड आणि छोटी -मोठी वाहनांची आणि पादचाऱ्यांचा नेहमीच वावर असतो.नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने हे मोठे खड्डे दिसून येत नाही त्यामुळे नाल्यात वाहने किंवा पाधचारी पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे मरसाळे यांनी सांगितले आहे.
येथील स्थानिक गरीबनगर शिवसेना शाखाप्रमुख रवींद्र सौदागर, उपशाखाप्रमुख गणेश साळवे ,अजय ननवरे ,आकाश कांबळे, दत्ता तेलंग, लव मरसाळे, राकेश चव्हाण ,ज्ञानेश्वर पाटोळे यांनी या धोकादायक खड्ड्यांचे बाबतीत मनपा प्रशासन अत्यंत उदासीन असून यामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याला सर्वस्वीपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील असा आरोप केला आहे.
यासंदर्भात ज्ञानेश्वर मरसाळे यांनी मनपा आयुक्त अजीज शेख यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती मरसाळे यांनी दिली आहे.
00000