विशेष
श्रीशा वागळे
गेल्या अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारतीय संघाला हुलकावणी देणारा विश्वविजय वेस्ट इंडिजच्या भूमीत साकारला. भारतीय संघ या स्पर्धेत ‘चॅम्पियन’सारखा खेळला आणि ‘चॅम्पियन’ ठरला. तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांसह राेहित शर्मा, विराट काेहली आणि राहुल द्रविड यांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. यंदाच्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना ‘न भूताे न भविष्यती’ असाच हाेता. भारतीय संघाने हातातूून निसटलेला विजय खेचून आणला. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा संघ ‘बाजीगर’ ठरला.
तमाम भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाच्िी आतुरतेने वाट बघत हाेते ताे क्षण अखेर आला. भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकत भारतीयांना खूश करून टाकलं. बार्बाडाेस येथे रंगलेेल्या अत्यंत राेमहर्षक अशा अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आि्रकेच्या संघाला धूळ चारत ‘न भूताे न भविष्यती’ असा विजय साकारला. सामना आणि विश्वचषक हातातून निसटताेय की काय असं वाटत असतानाच भारतीय गाेलंदाजांनी टिच्चून गाेलंदाजी करत गेलेला सामना भारताच्या बाजूने झुकवला. सूर्यकुमार यादवने अंतिम षट्कात डेव्हिड मिलरच्या घेतलेल्या झेलाने सामन्याची दिशाच बदलून टाकली. मिलरने मारलेला ताे षट्कारच हाेता. मात्र यावेळी नशीब आणि नियती भारताच्या बाजूने हाेते. सूर्याने टिपलेला ताे झेल ‘अनाकलनीय’ आणि ‘अविश्वसनीयच’ म्हणावा लागेल. सूर्याने झेल नाही तर विश्वचषकच टिपला. 1983 मधल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी विव्ह रिचर्डस यांचा झेल टिपत भारताला पहिलावाहिला एकदिवसीय विश्वचषक मिळवून दिला हाेता. 41 वर्षांपूर्वीच्या त्या आठवणीला सूर्याच्या त्या झेलामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या विजयानंतर कर्णधार राेहित शर्मा, विराट काेहली, हार्दिक पांड्या यांच्यासह तमाम खेळाडू आणि कर्मचारी वर्गाच्या डाेळ्यातलं पाणी एक वेगळीच कहाणी सांगून गेलं. शांत, संयमी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही आपल्या स्वभावाच्या विपरित ‘सेलिब्रेशन’ केलं. भारत्िीय क्रिकेट संघाने या विश्वचषकाच्या रुपात तब्बल अकरा वर्षांनी आयसीसी ट्राॅी जिंकली तर 2007 नंतर 17 वर्षांंनी टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. मधल्या काळात टीम इंंडियाला जेतेपदांनी अनेकदा हुलकावणी दिली. कधी उपांत्य तर कधी अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामाेरं जावं लागलं. गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातल्या अंतिम सामन्यातला पराभव खेळाडूंसह भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला हाेता. अनपेक्षित असा ताे पराभव मनात कुठेतरी सलत हाेता. म्हणूनच की काय टी-20 विश्वचषकात भारतीय संघ वेगळ्याच त्वेषाने खेळला आणि सतत हुलकावणी देणाèया विश्वविजयाला गवसणी घातली.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ अजेय आणि अजिंक्य राहिला. टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. सांघिक कामगिरी आणि विजिजाषू वृत्ती हे या विश्वचषकातल्या भारतीय संघाच्या कामगिरीचं ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. धावसंख्या माेठी असाे वा छाेटी, भारतीय संघाने कधीही हार मानली नाही. तसंच हा संघ कधीही एकाच खेळाडूवर अवलंबून राहिल्याचं चित्र यंदा दिसलं नाही. एका खेळाडूची कमतरता दुसèयाने भरून काढली. प्रत्येकाने छाेटं का हाेईना पण याेगदान देण्याचा प्रयत्न केला आणि या छाेट्या छाेट्या याेगदानांमधूनच भारताचा विजय साकारत गेला. एखादा षट्कारही किती महत्त्वाचा ठरू शकताे, हे या विश्वचषकातल्या अगदी कमी \रकाने साकारलेल्या विजयांनी दाखवून दिलं. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाने लढावू बाणा दाखवून दिला. या सामन्यात कमी धावसंख्या असतानाही भारतीय संघाने विजय साकारला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी कधीही आत्मविश्वास ढळू दिला नाही. न्यूयाॅर्कमधल्या धीम्या आणि प्रतिकूल खेळपट्टयांवर भल्याभल्या संघांचा कस लागत असताना भारतीय संंघाने संयमी खेळ केला. विराट काेहली अपयशी ठरत असताना राेहित शर्माने संघाला सावरलं तर कध्िी रिषभ पंत तर कधी सूर्यकुमार यादवने मदतीचा हात दिला. अंतिम सामन्यात विराट काेहलीचा खेळ बहरला. राेहित शर्मा, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर विराटने संयमी आणि जबाबदारीने खेळ करत आपल्या महानतेची प्रचितीच दिली. अंतिम सामन्यात अक्षर पटेलला शिवम दुबेच्या आधी \लंदाजीला पाठवण्याचे डावपेचही यशस्वी ठरले. या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्वही अधाेरेखित झालं.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याची प्रचिती टी-20 विश्वचषकातल्या अनेक सामन्यांमधून आली. \लंदाजी हे भारतीय संघाचं बलस्थान असलं तरी गाेलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारताने अनेक विजय साकारले. या स्पर्धेत जसप्रीत बुमराहला अर्शदीप सिंगची समर्थं साथ लाभली. अर्शदीपने 17 तर जसप्रीत बुमराहने 15 वळी टिपले. बुमराहला स्पर्धेतल्या सर्वाेत्तम खेळाडूचा किताब मिळाला. आपण या घडीचे सर्वाेत्तम वेगवान गाेालंदाज का आहाेत, हे त्याने वेळाेवेळी दाखवून दिलं. माेक्याच्या क्षणी भागीदारी माेडत त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या \लंदाजीला खिंडार पाडलं. त्याने टिच्चून केलेल्या गाेलंदाजीमुळे प्रतिस्पर्धीं \लंदाजांवरचं दडपण वाढल्याचं अनेकदा दिसून आलं. ि\रकी गाेलंदाजही भारताच्या मदतीला आले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या ि\रकीची जादू स्पर्धेत चांंगलीच चालली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला स्पर्धेबाहेर करण्यात या ि\रकी गाेलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजा मात्र यंदा अपयशी ठरला. त्याला अवघा एकच बळी टिपता आला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संंघांंविरुद्धही टीम इंडिया अजिबात डगमगली नाही. इंग्लंडला उपांत्य ेरीत माेठ्या \रकाने पराभूत करत भारतीय संघाने गेल्या टी-20 विश्वचषकातल्या मानहानीकारक पराभवाची परतेड केली तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करत एकदिवसीय विश्वचषकातल्या पराभवाचा वचपा काढला. या विश्वचषकात राेहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने \लंदाजी, गाेलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत सरस कामगिरी करत आयसीसी चषकांच्या विजयाचा दुष्काळ संपवला.
यंदाचा टी-20 विश्वचषक अनेक अर्थांनी अनाेखा ठरला. या स्पधेंत एकूण 20 संघ सहभागी झाले हाेते. त्यापैकी आठ संघ सुपर एट ेरीत दाखल झाले. या विश्वचषकात अनेक छाेट्या संघांनी प्रतिष्ठित संघांना विजयासाठी झुंजवल्याचं चित्र पहायला मिळालं. यूएसएसारख्या संघाने पाकिस्ताला नमवत सुपर एटमध्ये थाटात प्रवेश केला. या संघातल्या साैरभ नेत्रावळकर या मराठमाेळ्या गाेलंदाजाच्या कामगिरीची चांगलीच चर्चा झाली. अ\गाणिस्ताने न्यूझीलंडला नमवत सुपर एटमध्ये प्रवेश केला. अ\गाणिस्तानने या विश्वचषकात आपली कामगिरी चांगलीच उंचावली. या संघाने ऑस्ट्रेलियासारख्या दादा संघाला नमवत उपांत्य ेरीची कवाडंं खुली केली. अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशाला पराभूत करून उपांत्य ेरी गाठली. मात्र उपांत्य सामन्यात दक्षिण आि्रकेसमाेर त्यांची डाळ शिजू शकली नाही. अ\गाणिस्तानच्या संघाला अंतिम ेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी त्यांनी जगभरातल्या क्रिकेटचाहत्यांची मनं जिंकली. या स्पर्धेत खेळपट्टया हा चर्चेचा विषय ठरला. न्यूयाॅर्कची खेळपट्टी तर \लंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. वेस्ट इंडिजमधल्या काही मैदानांच्या खेळपट्टयाही सुमार दर्जाच्या असल्याची टीका झाली. विशेषत: दक्षिण आि्रका आणि अ\गाणिस्तान यांच्यातल्या सामन्यातली खेळपट्टी खूपच वाईट हाेती. या सामन्यानंतर सुटलाे… अशी दक्षिण आि्रकेचा कर्णधार एडन मार्करमने दिलेली प्रतिक्रिया खूपच बाेलकी हाेती. या विश्वचषकात संघांंना ार माेठ्या धावसंख्या रचता आल्या नाहीत मात्र कमी धावसंख्येचे चुरशीचे सामने हे या स्पर्धेचं वैशिषट्य ठरलं.
भारतीय संघ टी-20 विश्वचषकाचा विजेता ठरला आणि भारतात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. चाहत्यांनी माेठ्या उत्साहात जल्लाेष केला. टीम इंडियाने भारतीय चाहत्यांना या विश्वविजयाच्या रुपात एक अविस्मरणीय अशी भेटच दिली. मात्र या विजयानंतर विराट काेहल्ी आणि राेहित शर्मा यांनी टी-20 मधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. हे दाेन खेळाडू आता टी-20 मध्ये खेळताना दिसणार नाहीत. मात्र एकदिवसीय आणि कसाेटी सामने ते खेळत राहणार आहेत. या दाेघांच्या निवृत्तीने चाहत्यांच्या पाेटात गाेळा आला असला तरी त्यांनी याेग्य ‘टायमिंग’ साधल्याचं बाेललं जात आहे. भारताच्या ‘राेकाे’ जाेडीची कमतरता टी-20 मध्ये निश्चितच जाणवणार आहे. मात्र भावी पिढी या दाेघांकडून प्रेरणा घेऊन भारताच्या विजयाचा ध्वज असाच उंचावत ठेवेल, यात शंका नाही. 2007 मध्ये धाेनीसेनेने कमाल केली हाेती तर आता 2024 मध्ये राेेहितसेनेने विजयश्री अक्षरश: खेचून आणली. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही, हाच धडा भारतीय संघाने घालून दिला. धाव\लकावर कितीही धावा असल्या तरी दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाच्या बळावर बाजी पलटवता येेते, हे आपल्या खेळाडूंनी दाखवून दिलं. ‘अकल्पित’ आणि ‘अविस्मरणीय’ याच शब्दात अंतिम सामन्यातल्या या विजयाचं वर्णन करायला हवं. हा विश्वविजय भारतीय चाहत्यांच्या बराच काळ स्मरणात राहिल आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, यात शंका नाही. या विजयाबद्दल राेहितसेनेचं मन:पूर्वक अभिनंदन!
( अद्वैत ीचर्स)