Month: June 2024

भाजपाच्या ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

आवाजी मतदानानंतर विजयी घोषित नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी…

सरकार मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय करणार- मनोज जरांगे

जालना : सरकारकडून मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार आहे, हे आम्हाला दिसत आहे. त्यामुळं आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर १३ जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे मनोज जरांगे म्हणाले. १३ जुलैपर्यंत…

हे खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन-  उद्धव ठाकरे

मुंबई  :  राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत मतदान केले. यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या…

वंचितचा पुन्हा एकला चलो रे

 २८८ जागांवर स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी अकोला : आगामी विधानसभेसाठी वंचितने पुन्हा एकदा एकला चलो रेचा नारा दिला आहे.  राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या स्वबळाच्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागवले…

सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात-फडणवीस

मुंबई :  सर्वात जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत…

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार मुंबई  : आगामी विधानसभेपुर्वीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन यंदा वादळी ठरणारी आहे. लोकसभेच्या निवडणूकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचा विश्वास दुणावला आहे. तर सत्ता स्थापनेपासून विशेषता शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर…

पामबीच खाडी किनारा परिसरात स्वच्छता मोहीम

वाशी : नवी मुंबईतील स्वच्छताकार्यात तरुणाई स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार स्वच्छता कार्यात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. या अनुषंगाने विविध विभागांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, तसेच उपायुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. कैलास गायकवाड, घणसोली विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नेतृत्वाखाली पामबीचलगत खाडी किनारा परिसरात राबविण्यात आली. या वेळी घणसोली पामबीच खाडी किनारा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये स्थानिक नागरिकांप्रमाणेच तेजस्व करिअर अकॅडमीच्या ७० युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह इतर कचरा गोळा केला. यामध्ये घणसोली विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छता कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

डोंबिवलीकरांची आरोग्यदायी मैत्रीची ‘धाव’

10 हजार नागरिक होणार सहभागी     डोंबिवली, : डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुप यांच्या वतीने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत 4 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ चे  आयोजन करण्यात आले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी हा पुढाकार घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवली करांसाठी आरोग्यदायी मैत्रीची धाव म्हणजेच ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत बुधवारी मंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन अशा टप्प्यांत होणार आहे. 1.6 किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. यात 6 वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप 500 मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली 9 वर्ष डोंबिवली कल्याण मध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे. ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 5 किमी ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात 10 आणि 21 हजार मी सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळतील. फन रन धाव 1 मैल ची धावरनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल. 10 आणि 21 हजार मी या दोन श्रेणी कालबध्द शर्यती आयोजित केल्या आहेत. भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ०००

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण

मुंबई : परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनात पाण्याचा तुटवडा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आणि प्रसाधनगृहांसह इतर ठिकाणी अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर इमारतीत डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे धुळीच्या साम्राज्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. कलिना संकुलाजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर नाट्यशास्त्र विभाग, दुसऱ्या मजल्यावर संगीत विभाग, तिसऱ्या मजल्यावर लोककला अकादमी आणि चौथ्या मजल्यावर शाहीर अमरशेख अध्यासन केंद्र आहे. मात्र, बाहेरून प्रशस्त व चकचकीत दिसणारी ही इमारत आतून विविध सोयी-सुविधांपासून वंचित आहे. कलेचे धडे गिरवण्यासाठी सांस्कृतिक भवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे हाल सोसावे लागत असून बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रेही बंद आहेत आणि प्रसाधनगृहांमध्ये हात धुण्यासाठीही पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र टँकरचे पाणीही अपुरे पडते. तसेच, सांस्कृतिक भवनाच्या इमारतीत डागडुजीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वत्र धूळ व मातीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कोट सांस्कृतिक भवनातील गैरसोयींबाबत अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याने तक्रार केलेली नाही. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, प्रशासनाकडून तात्काळ सुधारणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी ०००००

कचरा व्यवस्थापनात नागरिकांनी सक्रिय सहभाग गरजेचा – सौरभ राव

ठाणे-  कचऱ्याबद्दल जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद वाढवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या संवादासाठी स्थानिक तरूणतरुणींचे गट, स्वयंसेवी संस्था, महिलांचे गट यांनी मदत घ्यावी, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नुकतेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एक संवाद सत्र आयोजित केले होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, नाल्यात टाकला जाणारा कचरा या सगळ्या पैलूंबाबत जनजागृती करून कचऱ्याच्या व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता यावर ठाणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी या संवाद सत्रात कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग यांच्याविषयी प्रास्ताविक केले. या सत्रास, समर्थ भारत व्यासपीठ, स्त्री मुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, सुनिलिमा सस्टेनेबल सोल्यूशन्स, आरनिसर्ग फाउंडेशन, एलएएचएस प्रतिष्ठान, ठाणे, रोटरी क्लब, ठाणे, ॲण्टी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन, हिरवं स्वप्न, हरियाली, स्वत्व, ठाणे आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी असे स्वरुप असलेल्या या सत्रात, घरगुती खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, एकल वापराच्या प्लास्टिकवरील प्रतिबंध, घनकचरा व्यवस्थापन करणारी मोठी गृहसंकुले, त्यांचे अनुभव, एनएसएसच्या विद्यार्थांच्या मदतीने शाळा, महाविद्यालयातील जागृती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, नाल्यात कचरा न टाकण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन, या सत्रात आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी केले. 000000