Month: June 2024

दरड कोसळण्याच्या घटनांपासून ‘मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य!

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार- एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर     ठाणे : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असाल्फ व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त देविदास क्षीरसागर इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई मध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी येथील सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आत मध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, २००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली कारण, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. चौकट स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धीका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले. चौकट असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे.हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

राज्य कॅरम प्रशिक्षण केंद्र – नोंदणी प्रक्रिया सुरु

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथे सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची  नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान या वातानुकूलित केंद्रात खेळाडूंना सराव करता येणार आहे. शिवाय दर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत राज्यातील युवा मुला मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून सरावासाठी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० खेळाडूंची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल. असोसिएशनने राज्यातील राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय विजेते तसेच छत्रपती पुरस्कारार्थी कॅरम खेळाडूंना या केंद्रात मोफत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दिनांक २९ जुन २०२४ पर्यंत संजय बर्वे भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ / ९९६९६०६०८२ यांच्याशी संपर्क साधावा. ००००००

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त – तहसीलदार अभिजित खोले

ठाणे : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर कारवाई करण्यात येऊन २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली. अवैध वाळू उपसाविरोधात आज जिल्हा प्रशासनाच्या भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात कारवाई करून 1 बार्ज, 1 संक्शन जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईतील मुद्देमालाची अंदाजे किंमत २४ लाख असून, यासंबंधी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार २६ जून रोजी सकाळी ९ वा काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात खारबाव मंडळ अधिकारी व भिवंडी मंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त तलाठी यांच्या मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये १ बार्ज, १ संक्शन आढळून आले. बार्जवरील कामगार पथकाची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार झाले. पळून जाण्यापूर्वी बार्ज वॉल काढण्यात आल्याने व बोटीच्या सहाय्याने ओढून आणणे शक्य नसल्याने तेथेच पाण्यात बुडवण्यात आला. १ सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर आणून खाडी किनारी काढून पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कट करुन नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.

समाज कल्याणच्या ठाणे सहाय्यक आयुक्त कार्यालयात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

ठाणे :  समता, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कळवा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन व आंतराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समाज कल्याणच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, लेखक व कवी रघुनाथ देशमुख, व्याख्याते बबन सरोदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था- बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार, समतादूत रेश्मा साळवे उपस्थित होत्या. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून यावेळी सामाजिक न्याय भवन ते पारसिक नगर, कळवा पा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भिवंडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. समाज कल्याण, मुंबई विभागच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराजाच्या विचारांची प्रेरणा घेवून स्वत:ची तसेच समाजाची  प्रगती कशी साधता येते यावर मार्गदर्शन केले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना व्यसनांपासुन दूर  रहाण्याचा संदेश देवून व्यसनमुक्तीवर आपले विचार मांडले. यावेळी श्री. देशमुख यांनी व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, व्यसन मुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांचे योगदान पाहिजे. छोटी-छोटी व्यसने सुध्दा आपले मोठे नुकसान करतात. व्यसनामुळे फक्त आपले नुकसान होत नसून सर्व कुटुंबाचे नुकसान होते. व्याख्याते श्री.सरोदे यांनी न्याय व सामाजिक न्याय यामधील फरक समजून सांगितला. तसेच समतादूत रेश्मा साळवे यांनी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेवून करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

आज २६ जून, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. आजच्याच दिवशी १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे…

सावधान! कोणत्याही नशेच्या आहारी जाणे घातकच

दरवर्षी २६ जूनला जगभर आंतरराष्ट्रीय नशा निरोधक दिवस साजरा केल्या जातो.नशेली वस्तुंचे निवारण व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ ला एक प्रस्ताव पारित केला व त्या अनुषंगाने…

धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा

विश्लेषण किशोर आपटे शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा! नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल ते करत कायदा संविधान…

निष्ठावंत कार्यकर्ते आणि पगारी प्रोफेशनल्स…

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेच्या मिडिया प्रमुख श्वेता शालिनी यांनी वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांना आपली व्यक्तिगत बदनामी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या प्रकरणामुळे काल महाराष्ट्रातील…