Month: June 2024

सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 22 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे :  ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड व ठाणे महानगरपालिका प्रदुषण विभागाच्यावतीने सदरची कारवाई सुरू असून आज माजिवडा मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 9.5 किलोक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत एकूण 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर सोमवारी (24/6/2024) वर्तकनगर प्रभागसमितीअंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लॅस्ट‍िक जप्त करण्यात आले. तर ‍विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16500/- रुपये दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकूण 22 किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन 39000 हजार रु. इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकच्या प्रदुषण विभागाने दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमितीअंतर्गत प्रतिबंधीत प्लॅस्टिकबंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले. 00000 बुध्दिबळ दिनानिमित्त २० जुलैपासून आयडियल बुध्दिबळ महोत्सव मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव  २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे  प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या  गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण  रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह  आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

महाविद्यालयीन शिष्यवृत्तीकरिता निवडलेल्या विद्यार्थ्यांना फेरअर्ज सादर करण्याची संधी – सुनिल जाधव

अशोक गायकवाड   रायगड : Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि.३० जून २०२४ पूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून महाविद्यालयीन शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन फेरसादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज…

मुंबई खो-खो संघटना तुषार सुर्वे व संजीव ठाकूरदेसाई यांचा  कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरव

मुंबई : मुंबई खो- खो संघटनेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या…

सिनियर पॉवरलिफ्टिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये

मुंबई :  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य सिनियर (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद -निवडचाचणी स्पर्धा – २०२४, २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये नागरिक सहाय्य केंद्र संचालित…

भाव रोखण्यासाठी तूर आणि हरभरा डाळीच्या साठ्यावर बंधने

देशात डाळींच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने एक आदेश जारी करून तूर आणि हरभरा डाळीवर साठा मर्यादा लागू केली आहे. यामुळे डाळींच्या साठेबाजीला…

आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले

आज २५ जून, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४९ वर्ष पूर्ण झाली. बरोबर ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी देशात…

चक्रावून टाकणारे कर्नाटकी गूढनाट्य

लक्षवेधी प्रा. डॉ. विजयकुमार पोटे चित्रदुर्गमधील रेणुका स्वामीला फिल्मस्टार दर्शन खूप आवडायचा. मात्र त्याच्या वैवाहिक जीवनात आलेल्या पवित्राचा राग यायचा. तो पवित्राला ‌‘सोशल मीडिया‌’वर गलिच्छ मेसेज पाठवायचा. मात्र या सवयीमुळे…

राजकीय पोरकटपणा…

विदर्भातील प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात सध्या विद्यमान नवनिर्वाचित खासदार आणि त्यांचे सहकारी आमदार मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालताना दिसत आहेत. त्याला राजकीय गोंधळ म्हणायचे की राजकीय नौटंकी…

“आणीबाणीशिवाय मोदींकडे बोलायला काहीच नाही”, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर…