Month: June 2024

प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा

ठाणे : सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे; बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे  सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी सोमवारी नायगावनजीकच्या सर्व्हीस सेंटरवर जाऊन आपल्या 100 हून अधिक बसगाड्या जमा केल्या. विशेष म्हणजे, या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भरपावसात धरणे आंदोलन केले. खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून अशोक लेलँडने बाजारात आणलेल्या 13. 5  मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र, या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे  फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच-  प्रेशर प्लेट, रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वाॅरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100  बस मालकांनी आज थेट सर्व्हीस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या. दरम्यान, या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही. किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बसमालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बसमालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले. 00000

शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज’ – अभिजीत कांबळे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : शिक्षणामुळेच माणसाचा उत्कर्ष होतो हा ठाम विश्वास ठेवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचाच विस्तार सर्वदूर झालेला असून छत्रपती शाहू महाराजांचा हा शैक्षणिक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे व त्यांनी आखून दिलेली पायवाट अधिक व्यापक केली पाहिजे असे मत व्याख्याते, संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून से.१५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक तथा व्याख्याते अभिजीत कांबळे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व विशद केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, वाचन, माहिती व ज्ञान यांना महत्व देणाऱ्या विचारांवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने ज्ञानस्मारक असून येथील अतिशय संपन्न ग्रंथालय अभ्यासकांसाठी तसेच बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत अभिजीत कांबळे यांनी नोंदविले. आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी असण्याचे मूळ शिक्षणात असून महात्मा फुले यांनी शिक्षणाला महत्व देत शाळा सुरु केल्या, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तशी तरतूद केली हा आपला समृध्द वारसाच प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास करताना पाच महत्वाचे मुद्दे जाणवले असे सांगत त्यांनी शाहू महाराजांनी राबविलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेले उपक्रम व कायदे, तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम व कायदे, संस्थानाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चाला सहा टक्के इतके दिलेले प्राधान्य तसेच वसतीगृहाच्या चळवळीमुळे गरजू व होतकरु मुलांना खुली झालेली शिक्षणाची दारे या पाच मुद्दयांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन विविध उदाहरणे देत मांडला. शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे असून त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रम हे आजच्या काळालाही सुसंगत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांचा उपयोग आजच्या काळात कसा करुन घेता येऊ शकतो या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणामुळे सुजाण व चांगला माणूस घडू शकतो आणि शिक्षण हे समाजाला परस्परांशी सद्भावनेने रहायला शिकवते त्यामुळे शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्याची गरज असून त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विकासाच्या नजरेतून पहायला हवे असे अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी व मान्यवरांनी स्मारकाला भेट देत येथील सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली असल्याचा आनंद व्यक्त करीत ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून महानगरपालिका सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेत दिग्गज व्याख्यात्यांनी मौलिक विचारधन दिलेले असून व्याख्यानांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सदर व्याख्यानाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व किसनराव पलांडे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख प्रफुल्ल वानखेडे, सुधाकर सोनवणे, श्रीम.हेमांगी व अंकुश सोनावणे व इतर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केले – सुप्रिया सुळे

मुंबई : घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा अशी कटकारस्थाने करीत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात…

राज्यात १ जुलै पासून कर्जमुक्ती आंदोलन – शेट्टी

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार…

अनेकांचे डोळे उघडण्याची गरज – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी हे विधान नेमकं कोणाला उद्देषून केले…

“कितीही चिखल असला तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही’’

आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला मुंबई : लोकसभा निवडणूकीत वरळीतून कमी मताधिक्य मिळाल्याने आदित्य ठाकरे वरळी मतदार संघ सोडणार असे भाकीत शिंदे सेनेचे खासदर श्रीकांत शिंदे यांनी केले होते. यावर भाष्य करताना वरळीत कितीही…

काही लोकांना बांबू लावला पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांना टोला लगावला. राऊतांचे नाव न घेता या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं. एकनाथ शिंदे म्हणाले…

सावधान ! 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई :  आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसापासून म्हणजे 1८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

आरक्षण ओबीसी कोट्यातूनच हवे

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा जालना : आम्हाच्या कुणबी नोंदीना कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र…