महायुतीत शिमगा सुरुच
रामदास कदमांचा भाजपाला इशारा, १०० जागा द्या, नाही तर २८८ लढू ! मुंबई: होळी संपली असली तरी महायुतीत अजुनही जोरदार शिमगा सुरु आहे. कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंच्या शिवसेनेतले नेते भाजपाविरोधात…
रामदास कदमांचा भाजपाला इशारा, १०० जागा द्या, नाही तर २८८ लढू ! मुंबई: होळी संपली असली तरी महायुतीत अजुनही जोरदार शिमगा सुरु आहे. कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंच्या शिवसेनेतले नेते भाजपाविरोधात…
काहीतरी नवीन… श्याम तारे नैराश्य ज्यांना सतावते त्याचे जीवन कठीण होते आणि त्यातून मार्ग म्हणजे मनोविकार तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधे घेत राहणे हा एकच असतो. नैराश्य कोणत्याही कारणाने…
आज २१ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत २१ जून हा दिवस…
अर्थनगरीतून ॲड. शिवाजी कराळे निवडणुकांमध्ये उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करता धनदांडगे आणि बाहुबली उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. खेरीज त्यांची संपत्ती, मालमत्ताही सातत्याने वाढताना दिसत आहे. राजकीय, सामाजिक…
पनवेल : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये आज भाजपच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा व युवा मोर्चाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीता पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, दिपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्निल खबाले ,वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याने फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धूत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंडघशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल्या. 00000
मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000
पालघर : पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उपनगरीय गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर काही ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने भरल्याने येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला होता. केळवे रोड रेल्वे स्थानक मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती. पालघरमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पालघर परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १३० मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही काळ रस्त्यावर पाणी आले. सकाळच्या वेळी काही ठिकाणची वाहतूक बंद होती. केळवे रोड परिसरात पुलाखालून जोरदार पाणी वाहत होते. उमरोळी येथे रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले, तर काहींना दांडी मारावी लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. बोईसर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने रेल्वे वाहतूक मंदगतीने सुरू होती.
दादरमधील हक्क सभेत हजारो घरकामगारांची उपस्थिती धारावी : राज्यातील लाखो घरेलु कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मंगळवारी झालेल्या हक्क सभेत करण्यात आली. राज्यातील १२०० घरकामगार, प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.घरकामगारांना सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्तीवेतन मिळावे, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यांतर्गत सुधारणा, घोषित योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने या हक्क सभेचे नियाेजन करण्यात आले होते. घरकामगार हक्क सभेला राज्य मानव अधिकार आयोगाचे (स्टेट ह्युमन कमिशन) एम. ए. सयीद, राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला शिफारस व सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी सांगितले. 0000
अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २२ जून व रविवार, दिनांक २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, 1.अधिवास (डोमेसाईल) दाखला, 2. रहिवासी दाखला, 3. उत्पन्नाचा दाखला आणि 4. ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. 00000
शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आरटीई प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे न्यायालयात गेले आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जेच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला. या कायद्यांतर्गत शासकीय, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवली जाते. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार १७ मे ते ४ जून या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते. परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागावरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. राज्य शासन आणि खासगी शाळा या वादात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळा सुरु झाल्या असून अभ्यासक्रमाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु, आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 00000