Month: June 2024

लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त…

संजय केळकर यांनी काढला कोकण पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी   ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

 दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अशोक गायकवाड   रायगड : दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल -ताशे , शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते. रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचं होते. या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता. 00000

‌‘महिंद्रा‌’ने टाकले ‌‘टाटा मोटर्स‌’ला मागे

महिंद्रा अँड महिंद्रा‌’च्या नावावर एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील या ऑटोमोबाईल कंपनीने ‌‘टाटा मोटर्स‌’ला मागे टाकले आहे. ‌‘महिंद्रा अँड महिंद्रा‌’ आता बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत देशातील…

टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या भावात 81 टक्के वाढ

गेल्या वर्षभरात महागाई सातत्याने वाढत आहे. अन्नधान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या दरात 81 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या घाऊक भावात…

योग म्हणजे फक्त आसन नव्हे!

आधुनिक युगात योगशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार झालेला आपल्याला पहायला मिळतो. लोकांना आपल्या शरीराची मर्यादा ओलांडून आसन करण्याचा व सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करण्याचा मोह आवरत नाही; परंतु…

वादळ पुन्हा घोगावते आहे !

छगन चंद्रकांत भुजबळ हे नाव गेली पस्तीस वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाकत वादळांशीच निगडित राहिले आहे. संघर्ष करत राहणे हाच त्यांचा स्वभाव ठरला. आणि आता वयाच्या पंचाहत्तरीत पोचल्या नंतरही त्यांच्या कृतीमुळे, बोलण्यामुळे…

‘नीट‌’च्या पावित्र्याला कलंक

खास बात डॉ. अजिंक्य बोराडे वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेणाऱ्या ‌‘नॅशनल टेस्ट एजन्सी‌’ (एनटीए) या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जयपूर उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे ‌‘नीट‌’ परीक्षा घेण्याबाबत तसेच वाढीव गुणांसंदर्भात…

‘शिवराज्यभिषेक’ सोहळ्यासाठी रायगड सज्ज

अशोक गायकवाड *रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच २० जून रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अवघा रायगड सज्ज झाला आहे. १६७४ मध्ये ज्येष्ठ शुक्ल…