Month: June 2024

वायकरांच्या वादग्रस्त विजयावर राहुल गांधीचाही हल्लाबोल

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी मिळविलेल्या ४८ मतांच्या वादग्रस्त विजयावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. व्टिटरचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हिएम…

भाजपा आमदाराचा पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

भिवंडी : भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा नारा दिला. भाजपाला लोकसभेत चारशेपारचा विजय मिळाला असता तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते असेही टी. राज सिंह…

वायकरांच्या विजयात मोबाईलचा झोल ?

 ईव्हीएम डेटा ऑपरेटर गुरव, वायकरांचा मेव्हणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्या फोन कॉलचे गौडबंगाल कायम मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या विजयात…

खासदारकीच्या कारकि‍र्दीत भिवंडीत १० वर्षांत एकही दंगल नाही

कपिल पाटील यांचे चोख प्रत्युत्तर, विधानसभा निवडणुकीत एकत्र मतदानासाठी आरोप   भिवंडी : भिवंडीतील एकही मुस्लिम नागरिक माझ्यावर दंगल घडविण्याचा आरोप करणार नाही. खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत भिवंडी शहरात एकही दंगल झालेली नसून, हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. दंगलीबाबत विधाने करीत मुस्लिमांची दिशाभूल करून लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकत्र मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता व्यक्त करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. तसेच हिंदू धर्म सभा व संत संमेलनाचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाजाचा असून, नवीननवीन लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधींना विजय पचनी पडत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला लगावला. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे शनिवारी सायंकाळी संत संमेलन व हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याला तेलंगणचे आमदार टी. राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे कपिल पाटील फौंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले असून, भिवंडीत दंगली घडविण्याचा डाव आहे, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला होता. या आरोपांना कपिल पाटील यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. या संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाने केले आहे. परंतु, कपिल पाटील फौंडेशनला ही संधी मिळाली असती, तर भाग्यवान समजलो असतो, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. यापूर्वी २०१५ मध्ये कामतघर येथील वऱ्हाळदेवी तलावालगत टी. राजा सिंह यांची सभा झाली होती. त्यानंतर भिवंडीत दंगल घडलेली नव्हती. गेल्या दहा वर्षांत हिंदू मुस्लिमांबरोबरच सर्व समाज व जातीबांधव गुण्यागोविंदांने राहत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुस्लिमांचे एकत्रित मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता श्री. कपिल पाटील यांनी व्यक्त केली. हिंदू धर्माच्या जागृतीबाबत आयोजित केलेल्या संमेलनाला विरोध केला जात आहे. टी. राजा सिंह यांची सभा घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला. अशा प्रकारे संत-महंतांचा अपमान शिवसेना उद्धव ठाकरे गट सहन करणार आहे का. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिमानाने हिंदूत्व सोडले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या भिवंडीतील अनुयायांना हा प्रकार मान्य आहे का, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार का, असे आव्हान माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. अनधिकृत बांधकामांबाबत वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला. सुरेश म्हात्रे यांनी स्वत: आपल्या बांधकामांसाठी स्थगिती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या बांधकामांना माझे संरक्षण होते का? भिवंडी अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करावयाची असल्यास, स्वतचा जेसीबी घेऊन स्वत:ची अनधिकृत बांधकामे पाडावीत, असे आव्हान कपिल पाटील यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवे धोरण आणल्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण खासदार झाल्यावर पहिल्याच दिवशी या शेतकऱ्यांच्या मुलांचे उत्पन्न बंद करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका श्री. कपिल पाटील यांनी केली. सुरेश म्हात्रे यांच्याकडून केल्या जाणारे निराधार आरोप सहन केले जाणार नाहीत. याप्रकरणी कायदेशीर दावा दाखल केला जाईल, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. भिवंडीत पोलिसाला मारहाणीकडे केले दुर्लक्ष लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी शहरात दिवसांपूर्वी पोलिसाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी सुरेश म्हात्रे कोठे होते. त्यावेळी ते पुढे का आले नाहीत, असा सवाल कपिल पाटील यांनी केला.

‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही – सुनिल तटकरे

रोहा : राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही  कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि  त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द सुनिल तटकरे यांनी रोहेकरांना दिला. सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. ४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही  आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला. तटकरेसाहेब हे आपल्या घरातलीच व्यक्ती समजून तुम्ही मतदारसंघात उतरलात आणि आपण घेतलेल्या परिश्रमाला जनतेने प्रतिसाद चांगला दिला. महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आभार दौरा दिनांक १४ जूनपासून सुरू केला असून दुसर्‍या दिवशी रोहा येथे महायुतीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, नितीन तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कुणबी समाज नेते सुनिल मगर, कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नेत्या दिपिका चिपळूणकर आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रवेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा आज (दि. १५ जून २०२४ ) सुरू झाले असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांनी शाळा भेट दिली आहे. भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा वैजोळा, केंद्र शिवनगर येथे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, गोड पदार्थ, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिल्या दिवशी जसे सर्वांनी हजेरी लावली तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत उपस्थित रहावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले. आज प्रवेशोत्सव निमित्ताने शासकीय शाळेत गावातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहात ही खरी आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे यासाठी पालकांनी विशेष सहकार्य करावे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. आहार आणि आरोग्य उत्तम राहिल्यास शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागेल. जंक फूड न खाता विद्यार्थ्यांनी उत्तम आहार घ्यावा. शाळा छोटी असून देखील शाळेतील शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६० विद्यार्थीं या शाळेत शिक्षण घेत आहेत. आज शाळा सुरू होत असून शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यीं, पालक, शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी यांनी केले. प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळा भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल अर्चना पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी संजय असवले, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुऱ्हाडे, शाळेचे शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम   ठाणे : आई-बा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर…

मुख्यमंत्री पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत

विक्रोळीजवळील अपघातग्रस्त तरुण आणि महिलेला दिला मदतीचा हात    ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल   मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटूंबाची चौकशी केली. यात तरुण आणि मुस्लिम कुटूंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन करून जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले. तसेच सोबत आपला अधिकारी देखील मदतीसाठी दिला.रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्याने या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. मात्र यानिमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा नव्याने अनुभव आला. 00000

Photo-2  जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश उपक्रमासाठी ८ कोटींचा निधी – छायादेवी शिसोदे

ठाणे : तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे, यामुळे या सर्व कामांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षणविभागाची माहिती दिली. तालुक्यात ५७३ शाळा असून समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तिका वाटप करण्यात आले आहे. शाळा प्रवेश उत्सव मंगळवारी करण्यात येणार आहे. विशेष मोहिम राबवून शाळाबाह्य मुले ३० जून पर्यंत शोधमोहीम करण्यात येईल. सावरोली येथिल प्राथमिक शाळेत २ हजार सिडबॉल तयार केले आहे.तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे. या सर्व कामामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. शहापूर तालुक्यातील कामकाजची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर येथे भेट देऊन विविध कामांचा आज (दि. १४ जून २०२४) आढावा घेतला. याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती शहापूर मार्फत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्वागत केले. आपत्कालीन, दुर्धर आजार, साथरोग आजार नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष व भरारी पथक जिल्हा व तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे.‌ पाणी उकळून व गाळून प्यावे यासाठी ग्रामस्थांना माहिती घ्यावी असे ग्रामसेवकांना माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.  शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल ३ हजार ८९५ असून ३७१६ पूर्ण घरकुल व १७९ अपूर्ण घरकुल असल्याने पुढील नियोजन लवकरात लवकर करावे अशा सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी मंगलसिंग बाबुलाल परमार घरकुलाचे १८९ पैकी १८१ घरकुल पुर्ण केल्याने उत्तम कामकाज केल्याने व ग्रामसेवक मंगेश जाधव यांनी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कोठेरे येथिल मौजे वेटा पाडा येथे नळ पाणी पाणीपुरवठा संदर्भातील डोंगराळ भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. समाज कल्याण विभागातील ४५ काम पुर्ण केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी अभिनंदन केले. विभाग निहाय उपलब्ध झालेला निधी पुर्ण खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. ग्रामस्थांनाच्या कल्याणासाठी काम करताना आपण मोलाचं काम करावं. कृषी विभागाने भाजीपाला लागवड, बियाणे विक्री यासंदर्भात उत्तम काम करित असल्याने कृषी विभागाचे अभिनंदन केले. तालुक्यात १५ वित्त आयोग अंतर्गत अखर्चित रक्कम खर्च करण्यासाठी सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी दिले. जनसुविधा अंतर्गत ११२ काम आणि नागरीसुविधा ४३ काम, तिर्थक्षेत्र संदर्भातील ४ काम सुरू आहे. माझी वसुंधरा अतंर्गत सर्व ग्रामपंचायतींमधील कामाची माहिती घेण्यात आली. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अपूर्ण कामे पुढील आठवड्यात पूर्ण करण्याबाबत माहिती देण्यात आली. मनरेगा अंतर्गत प्रत्येकी ग्रामपंचायत निहाय २०० वृक्षलागवड पुढील सात दिवसात करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वं कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी घेतला.बोगस बियाणे, तांत्रिक तुटवडा, जास्त दरांनी बियाणे विक्री तालुक्यात होऊ नये यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका स्तरावरील कृषी अधिकारी यांनी तपासणी करावी असे आदेश देण्यात आले. तालुक्यात बियाणांच्या तक्रारींकडे ग्रामसेवकांनी विशेष लक्ष द्यावे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव जास्तीत जास्त यावे असे आदेश कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिले. आढावा बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याचे सक्त सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागातील बांधकाम संदर्भात माहिती यावेळी घेण्यात आली. मान्सून पूर्व लसीकरण तालुक्यात १०० टक्के पुर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील पशुपालकांना आवाहन करून टॅगिंग करून घेण्यात यावे अशी विनंती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी केले. गाव निहाय चारा आराखडा तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत निहाय माहिती देण्यात यावी असे ग्रामसेवकांना आवाहन करण्यात आले. लघुपाटबंधारे विभागाचे सन २०२३-२४ मधील एकूण ३३ काम असून प्रत्येक काम निहाय आढावा उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद यांनी माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यात जलस्रोतचे पाणी नमुने तपासणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. शहापूर तालुक्यात बाल मृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी पावसाळ्यात माहेर घर योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाणार आहे‌. जननी सुरक्षा योजना यशस्वी राबविण्यासाठी शहापूर तालुक्यात जास्त समस्या असून गरोदर मातेची कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत तयार करून द्यावी अशी विनंती डॉ.‌स्वाती पाटील यांनी केली. तालुक्यातील जन्म मृत्यू नोंदी ऑनलाईन पध्दतीने ग्रामसेवक यांनी करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील यांची ऑनलाईन नोंद व्हावी. जल जीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. चार काम सुरू नसून ती काम लवकर सुरू करण्याच्या सक्त सूचना यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी दिले. पाणी टाकी बांधकाम ११४ काम अपुर्ण असून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पूर्ण करावे. पुढील एक आठवड्यात अपूर्ण काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. हायवे लगतच्या सर्व गावांच्या स्वच्छतेसाठी नोटीस बोर्ड, सुशोभीकरण करून कामकाज करावे अशा सुचना देऊन ग्रामसेवकांना आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत निहाय प्रयत्न करावे अशी सुचना देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी आपल्या सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण जबाबदारीने नियोजन करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रदिप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, उपअभियंता विकास जाधव, उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष पांडे, इतर सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख, मुख्य सेविका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते.