Month: June 2024

मोदानीच्या महाजमीन घोटाळ्याविरुद्ध संसद व संसदे बाहेरही लढू- वर्षा गायकवाड

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींच्या DRPPL ला प्रस्थापित नियम बासनात गुंडाळून जमिनी का दिल्या जात आहेत? Slug २- कुर्ल्यातील जमीन अदानीला देताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष; मोदींच्या मित्रासाठी शासकीय प्रक्रिया डावलल्या मुंबई : मुंबईमध्ये मोदानी अँड कंपनीचा महाजमीन घोटाळा जोमात सुरू आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या मोक्याच्या सार्वजनिक जागा नाममात्र दरावर प्रस्थापित नियमांना आणि प्रक्रियेला बगल देऊन अदानींच्या समूहाला भेट देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली कुर्ला येथील मदर डेअरीसाठी पूर्वी वापरण्यात येणारी शासकीय जमीन याच महाघोटाळ्याचा एक भाग असून या महाघोटाळ्याच्या विरुद्ध संसदेत, विधानसभेत, कोर्टात आणि रस्त्यावर उतरून लढू पण मुंबईकरांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अदानीसाठी मुंबईतील भूखंड अत्यंत कमी दराने देण्याचा शिंदे भाजपा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून हा एक मोठा जमीन घोटाळा आहे. मदर डेअरीची २१ एकर जमीन अदानीला देताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलेले नाही. जमीन देण्याआधी जाहिरात दिली पाहिजे, कलेक्टर यांनी प्रस्ताव बनवनू तो शासनाला पाठवला पाहिजे व नंतर योग्य त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात पण या भूखंड हस्तांतरणाप्रकरणी अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही जमीन अदानीला दिल्याचा शासन आदेस १० जूनला जारी केला आहे. अशा प्रकारचा व्यवहार करताना १९७१ च्या कायद्यानुसार होणे अपेक्षित आहे पण अदानी हे पंतप्रधानांचे मित्र असल्याकारणाने बगल देण्यात आली आहे असे गायकवाड म्हणाल्या. सर्व धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे ही तमाम धारावीकरांची भूमिका असताना, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मिठागरे, जकात नाक्यासाठी वापरण्यात येणारी महापालिकेची जमीन, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन किंवा कुर्ला डेअरीची जमीन अदानींच्या DRPPL ला प्रस्थापित नियमांना बासनात गुंडाळून का दिल्या जात आहेत? कुर्ला डेअरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची ऑर्डर महत्वाची आहे की भाजपच्या मंत्र्यांची?  असे प्रश्न उपस्थित करून कुर्ला येथील नेहरू नगरच्या नागरिकांनी या हिरवळीच्या भूखंड संवर्धनासाठी सार्वजनिक उद्यान निर्माणासाठी लोकचळवळ निर्माण केली आहे. या चळवळीत काँग्रेस पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर राहू व मोदानी अँड कंपनीच्या मुंबई गिळण्याच्या मनसुब्यांना पराभूत करू असेही गायकवाड म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेण्यास शिंदे सरकारला वर्षभरात वेळ मिळाला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना या स्मारकाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यासाठी कार्यरत होती, स्मारकावर हवेचा परिणाम होणार नाही यासाठी विविध भागात जाऊन माहिती घेतली  होती व त्यावर चर्चाही केली होती. बाबासाहेबांच्या स्मारकांप्रमाणेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही दुर्लक्षित आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे जलपूजन केले होते पण अजून या स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही. भारतीय जनता पक्षाला महापुरुषांची आठवण फक्त निवडणुकीतच होते, असेही गायकवाड म्हणाल्या. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, खजिनदार संदीप शुक्ला, मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, निजामुद्दीन रायीन आदी उपस्थित होते.

 जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड

माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी  वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी  रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व  अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.

तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश उपक्रमासाठी ८ कोटींचा निधी – छायादेवी शिसोदे

ठाणे : तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे, यामुळे या सर्व कामांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षणविभागाची माहिती दिली. तालुक्यात ५७३ शाळा असून समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तिका वाटप करण्यात आले आहे. शाळा प्रवेश उत्सव मंगळवारी करण्यात येणार आहे. विशेष मोहिम राबवून शाळाबाह्य मुले ३० जून पर्यंत शोधमोहीम करण्यात येईल. सावरोली येथिल प्राथमिक शाळेत २ हजार सिडबॉल तयार केले आहे.तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे. या सर्व कामामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. शहापूर तालुक्यातील कामकाजची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर येथे भेट देऊन विविध कामांचा आज (दि. १४ जून २०२४) आढावा घेतला. याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती शहापूर मार्फत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्वागत केले. आपत्कालीन, दुर्धर आजार, साथरोग आजार नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष व भरारी पथक जिल्हा व तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे.‌ पाणी उकळून व गाळून प्यावे यासाठी ग्रामस्थांना माहिती घ्यावी असे ग्रामसेवकांना माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.  शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल ३ हजार ८९५ असून ३७१६ पूर्ण घरकुल व १७९ अपूर्ण घरकुल असल्याने पुढील नियोजन लवकरात लवकर करावे अशा सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी मंगलसिंग बाबुलाल परमार घरकुलाचे १८९ पैकी १८१ घरकुल पुर्ण केल्याने उत्तम कामकाज केल्याने व ग्रामसेवक मंगेश जाधव यांनी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कोठेरे येथिल मौजे वेटा पाडा येथे नळ पाणी पाणीपुरवठा संदर्भातील डोंगराळ भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. समाज कल्याण विभागातील ४५ काम पुर्ण केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी अभिनंदन केले. विभाग निहाय उपलब्ध झालेला निधी पुर्ण खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. ग्रामस्थांनाच्या कल्याणासाठी काम करताना आपण मोलाचं काम करावं. कृषी विभागाने भाजीपाला लागवड, बियाणे विक्री यासंदर्भात उत्तम काम करित असल्याने कृषी विभागाचे अभिनंदन केले. तालुक्यात १५ वित्त आयोग अंतर्गत अखर्चित रक्कम खर्च करण्यासाठी सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी दिले. जनसुविधा अंतर्गत ११२ काम आणि नागरीसुविधा ४३ काम, तिर्थक्षेत्र संदर्भातील ४ काम सुरू आहे. माझी वसुंधरा अतंर्गत सर्व ग्रामपंचायतींमधील कामाची माहिती घेण्यात आली. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अपूर्ण कामे पुढील आठवड्यात पूर्ण करण्याबाबत माहिती देण्यात आली. मनरेगा अंतर्गत प्रत्येकी ग्रामपंचायत निहाय २०० वृक्षलागवड पुढील सात दिवसात करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वं कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी घेतला.बोगस बियाणे, तांत्रिक तुटवडा, जास्त दरांनी बियाणे विक्री तालुक्यात होऊ नये यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका स्तरावरील कृषी अधिकारी यांनी तपासणी करावी असे आदेश देण्यात आले. तालुक्यात बियाणांच्या तक्रारींकडे ग्रामसेवकांनी विशेष लक्ष द्यावे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव जास्तीत जास्त यावे असे आदेश कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिले. आढावा बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याचे सक्त सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागातील बांधकाम संदर्भात माहिती यावेळी घेण्यात आली. मान्सून पूर्व लसीकरण तालुक्यात १०० टक्के पुर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील पशुपालकांना आवाहन करून टॅगिंग करून घेण्यात यावे अशी विनंती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी केले. गाव निहाय चारा आराखडा तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत निहाय माहिती देण्यात यावी असे ग्रामसेवकांना आवाहन करण्यात आले. लघुपाटबंधारे विभागाचे सन २०२३-२४ मधील एकूण ३३ काम असून प्रत्येक काम निहाय आढावा उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद यांनी माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यात जलस्रोतचे पाणी नमुने तपासणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. शहापूर तालुक्यात बाल मृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी पावसाळ्यात माहेर घर योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाणार आहे‌. जननी सुरक्षा योजना यशस्वी राबविण्यासाठी शहापूर तालुक्यात जास्त समस्या असून गरोदर मातेची कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत तयार करून द्यावी अशी विनंती डॉ.‌स्वाती पाटील यांनी केली. तालुक्यातील जन्म मृत्यू नोंदी ऑनलाईन पध्दतीने ग्रामसेवक यांनी करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील यांची ऑनलाईन नोंद व्हावी. जल जीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. चार काम सुरू नसून ती काम लवकर सुरू करण्याच्या सक्त सूचना यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी दिले. पाणी टाकी बांधकाम ११४ काम अपुर्ण असून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पूर्ण करावे. पुढील एक आठवड्यात अपूर्ण काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. हायवे लगतच्या सर्व गावांच्या स्वच्छतेसाठी नोटीस बोर्ड, सुशोभीकरण करून कामकाज करावे अशा सुचना देऊन ग्रामसेवकांना आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत निहाय प्रयत्न करावे अशी सुचना देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी आपल्या सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण जबाबदारीने नियोजन करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रदिप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, उपअभियंता विकास जाधव, उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष पांडे, इतर सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख, मुख्य सेविका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते.

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ

ठाणे :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, 26 जूनला होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातीलर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.  या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, 26 जून सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती.  परंतू आता भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे.  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी  पदवीधर व शिक्षक मतदारांनी  मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा  असे आवाहन उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.

२९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : सर्वोच्च न्यायालयाद्वारे विधी सेवा प्राधिकरणने सहकार्य घेत २९ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचा नागरिकांनी लाभ…

कल्याणमधून विधानसभा निवडणूक लढवणारच

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचा निर्धार   कल्याण : 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. परंतू त्याच चुका आता पुन्हा होणार नाहीत. कल्याण पूर्वेतून विधानसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. पक्षाने पश्चिमेचे तिकीट दिल्यास त्याची देखील तयारी आहे. 2024 च्या विधानसभेची गणिते तयार असून या निवडणूकीत पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष उभे राहण्याची देखील तयारी असल्याचे मत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी डोंबिवलीत करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार… काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे. मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.

संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांना स्थगिती देण्यास पालिकेचा नकार

१० मीटर नियमावली लागू असल्याचे स्पष्ट   मुंबई : संरक्षण विभागाच्या आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत सुरु असलेल्या सुमारे शंभरहून अधिक बांधकामांना स्थगिती देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे तूर्तास या पट्ट्यातील बांधकामांना अभय मिळाले असले तरी अद्याप संरक्षण आस्थापनेकडून पालिकेच्या या पत्राला काहीही उत्तर पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे या बांधकामांवरील स्थगितीची टांगती तलवार कायम आहे. मात्र यावेळी पालिकेने संरक्षण आस्थापनेने स्थगिती देण्यास सांगूनही ते आदेश पाळलेले नाहीत, असे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संरक्षण आस्थापनेअंतर्गत कांदिवली व मालाड येथील ऑर्डनन्स डेपो पासून १०० ते ५०० मीटरच्या परिघात परवानगीविना बांधकामे सुरु असून या बांधकामांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी, असे पत्र कांदिवली येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पाठविले होते. असे पत्र मिळताच पालिका तसेच तत्सम नियोजन प्राधिकरणांकडून तात्काळ स्थगिती आदेश जारी केला जात होता. यावेळी मात्र पालिकेने स्थगिती आदेश जारी करण्याऐवजी संरक्षण आस्थापनेला पत्र पाठवून अशी स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. २१ ऑक्टोबर २०१६ च्या परिपत्रकानुसार, संरक्षण आस्थापनांपासून १० मीटरनंतरच्या बांधकामांना संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे ही स्पष्ट केले आहे. सेंट्रल ऑर्डनन्स डेपोने १५ मे रोजी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला पत्र पाठवून संरक्षण आस्थापनांपासून १०० ते ५०० मीटरपर्यंत असलेल्या बांधकामांना संरक्षण विभागाचे १८ मे २०११ चे परिपत्रक नियमावली लागू असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या परिघात चार मजली बांधकाम करता येते, याकडे लक्ष वेधले होते. २०१६ च्या परिपत्रकाचा फेरविचार सुरु असल्याचेही त्यात म्हटले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवालाही देण्यात आला होता. मात्र पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने २०१६ चे परिपत्रक लागू असून राज्याच्या नगरविकास विभागानेही त्या अनुषंगाने आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत नगरविकास विभागाकडून स्पष्टीकरण घ्यावे, असेही सुचविले आहे. त्यानुसार या शंभरहून अधिक बांधकामांना परवानगी देण्यात आली असून या बांधकामांना स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. संरक्षण आस्थापनांचा घोळ काय? संरक्षण आस्थापनांभोवतालच्या बांधकामांबाबत १८ मे २०११ चे परिपत्रक लागू होते. त्यानुसार १०० ते ५०० मीटरपर्यंत चार मजली इमारतीला परवानगी होती. त्यामुळे अनेक बांधकामे रखडल्यामुळे २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये परिपत्रक जारी करुन ही मर्यादा १० ते १०० मीटरपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून ती मर्यादा ५० मीटर करण्यात आली. मात्र हे परिपत्रक स्थगित करण्यात आले आहे. या घोळामुळे तूर्तास कांदिवली-मालाड परिसरातील १०० हून अधिक बांधकामांवर टांगती तलवार कायम आहे. 00000

ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी

पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू   ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत दोन जणांनी उडी मारली आहे. यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला आहे. तर महिलेचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वागळे इस्टेट भागात राहत होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजता साकेत पुलावरून दोनजणांनी खाडीत उड्या मारल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खाडीत शोधकार्य सुरू होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पथकांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. त्यावेळी बबलू विश्वकर्मा याचा मृतदेह पथकांना आढळून आला. तर चार तासांच्या शोध कार्यानंतरही महिलेचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधकार्य तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आले आहे. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ०००००

विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार..!

अनिल ठाणेकर   ठाणे : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट आता त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत  ताटकळत  उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार  एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. ००००

 १७ कोटी ६९ लाखांची मदत, गंभीर आजारातील २५८ रुग्णांना मिळाले जीवनदान –  रामेश्वर नाईक

 राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून ठाणे : निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि – न्याय विभाग अंतर्गत विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले असून या कक्षाच्या माध्यमातून कॅन्सर, लिव्हर – किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट सारख्या गंभीर आजार असणाऱ्या २५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवीन जीवनदान देण्यात आले आहेत. या शस्त्रक्रियांसाठी १७ कोटी ६९ लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आले असून त्या बेडवर मोफत तसेच सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळावे म्हणून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ पासून हे कक्ष सुरु झाले असून राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे.  कॅन्सर, लिव्हर – किडनी  ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन सारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियासाठी लाखोंचा निधी लागतो त्यामुळे हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर असतो. म्हणून अशा रुग्णांना पुन्हा नवीन जीवन मिळावे यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून उपचार तसेच आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या कक्षाची स्थापना झाली असून मे महिन्यांपर्यंत २५८ गंभीर आजार असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय रुग्णालय तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून या २५८ रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात, त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान असल्याचे रामेश्वर नाईक यांनी अधोरेखित केले. चौकट : महीना                      धर्मादाय रुग्णालय मदत                 खासगी ट्रस्टकडून मदत जानेवारी :                २.१६ कोटी                                        ६८ लाख फेब्रुवारी  :                ३.१५ कोटी                                         १.१४ कोटी मार्च  :                      ३.१७ कोटी                                       १.३२ कोटी एप्रिल :                    १.६१ कोटी                                         ७० लाख मे       :                   १.६७ कोटी                                         २.९ कोटी एकूण :                    १७ कोटी ६९ लाख रूपये 00000