Month: June 2024

मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदे द्या, अन्यथा विधानसभेच्या 30 जागा लढवणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे :  पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच, विधानसभा निवडणुकीत  आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही ३० जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पीआरपीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते. त्यावेळेस ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपील लिंगायत, एन. डी. सोनकांबळे, अनिल तुरूकमारे, विजय वाघमारे,  आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर,  रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी,  शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित  होते. प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित,  पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे  भान ठेवून कुणीही दुखावणार नाही, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत, आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे; आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात; अन्यथा, आम्ही ३० जागांवर निवडणूक लढवू, असे सांगितले. दरम्यान, संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. 000000

ग्रीन स्कूल, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, जुनी पेन्शन योजना लागू करणार – निरंजन डावखरे

कल्याणमधील शाळा-कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा अनिल ठाणेकर   ठाणे : कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार, स्पर्धा परिक्षेसाठी उत्तम व नेमके मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रयत्‍न करणार, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे वचन कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना दिले. व्हिजन डाॅक्युमेंट अंतर्गत मिशन एज्युकेशनुसार नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रीन स्कूल, डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब सुरु करणार, जिल्हानिहाय स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय, संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. तसेच मतदान करताना बॅलेटपेपरवर होणाऱ्या मतदानात, ‘डावखरे निरंजन वसंत’ या नावासमोरील व छायाचित्रासमोरील रिकाम्या चौकटीत, चौकटीला स्पर्श न करता एक उभी रेष (౹) मारुन बॅलेटपेपरला उभी घडी मारावी, असे आवाहन आ. निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाला केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी कल्याण शहरातील, श्री वाणी विद्यालय-कल्याण पश्चिम, गुरुनानक स्कूल-कल्याण पश्चिम, नूतन हायस्कूल-कल्याण पश्चिम, ओक हायस्कूल- कल्याण पश्चिम अचीवर्स कॉलेज-कल्याण पश्चिम, नूतन ज्ञान मंदिर-कल्याण पूर्व, आयडियल स्कूल अँड कॉलेज-कल्याण पूर्व आदी शाळा-काॅलेजमधून प्रचार दौरा केला. या दोऱ्याच्या निमित्ताने झालेल्या सभांमध्ये मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने आपला पाठींबा निरंजन डावखरे यांना व्यक्त केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, कल्याण पुर्व भाजपा शहराध्यक्ष संजय मोरे,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन.एम.भामरे, शिक्षक आघाडी कल्याण डोंबिवली महानगर संयोजक सुभाष सरोदे, सहसंयोजक अनिरुद्ध चव्हाण, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भामरे, देसले, अर्जुन उगलमुगले, चंद्रकांत ठाकूर, भास्कर नारखडे, बाळकृष्ण जगे, दीपक राजपूत, सुधाकर ठोके, प्रमोद चौधरी, गोकुळ गवळे, सचिन निकम, तेजनारायान सिंह, वीरेंद्र तिवारी, नितीन मुंडे आदी भाजप शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा

विशेष श्याम ठाणेदार अपेक्षेप्रमाणे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. ९ जूनच्या सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नव्या सरकारचा दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे…

महाराष्ट्रामध्ये तरंग कसे उमटणार?

चर्चेत प्रा. अशोक ढगे लोकसभा निवडणूक निकालांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेता राज्यात महाविकास आघाडीने 164 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हा पॅटर्न विधानसभेत दिसणार नाही…

निलेश लंके.. अपरिपक्व राजकारणी..

नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काल पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सत्कार स्वीकारल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज दिवसभर विविध वृत्तवाहिन्या…

मराठा आंदोलकांचे आता शाहगड येथे कार्यालय

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात सुसुत्रता यावी यासाठी आता शाहगड येथे मुख्य कार्यालय सुरू करणार असून, कुठे असलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे.  पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षण ओबीसीत नाही…

अण्णा हजारेंचा बोलवता धनी कोण ?- जयंत पाटील

मुंबई : अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. मागचे अनेक वर्षे त्यांचे मौन होते. आता बोलतायत हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधावं.  त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाला नाही. त्यांचा…

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २८ जूनला मांडणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे…

मुंबई यंदाच्या पावसाळ्यात तुंबणार ?

मुंबई : मान्सुन मुंबईत दाखल झाला असला तरी महापालिकेचे आठ हजार कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवर असल्याने पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा होत असल्याचं समोर आलंय. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा असून मुसळधार पाऊस पडला तर…