Month: June 2024

 महायुतीच्या कार्यकर्त्याच्या साथीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईन

कपिल मोरेश्वर पाटील यांचा विश्वास, भिवंडीत हजारो कार्यकर्त्यांची सभा भिवंडी : आगामी काळातील विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहा पट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल. आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून, कार्यकर्त्यांच्या साथीने राखेतून पुन्हा भरारी घेऊ, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. त्याचबरोबर भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिकनिमित्ताने आनंदोत्सव आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथून यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिवंडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कपिल पाटील यांनी उपस्थित हजारो कार्यकर्ते व नागरिकांबरोबर संवाद साधला. या वेळी भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी  भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून मोदी… मोदी… गजर केल्याने वातावरण दुमदुमून गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढील पाच वर्षांत होणार्‍या कार्यातून गौरवशाली इतिहास घडविला जाईल. भाजपासह महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मोदीजींचा विकास हा घराघरांपर्यंत पोचवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अनपेक्षित पराभवाने आलेली मरगळ दूर करून विधानसभा व महापालिका निवडणुकीत विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. भिवंडीत `तो’ पॅटर्न चालल्यानंतरही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असते, तर आपली हार झाली नसती. देशात अनेक ठिकाणी चाललेल्या पॅटर्नप्रमाणे भिवंडी मतदारसंघात `घरभेदी’ हा पॅटर्नही चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा हा पराभव झाला असून, त्यात योगदान देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना खड्यासारखे बाजूला करून भाजपाला मजबूत करण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी व नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहील. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. चौकट तेच प्रेम…तोच विश्वास… अन् उसळलेली उत्स्फूर्त गर्दी! भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅट्रीकनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते. तर अनेकांनी कपिल पाटील यांना हस्तांदोलन करीत पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या

अशोक लेलँड च्या कार्यालयात चालक, मालकांचा ठिय्या ठाणे :  मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय, भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत  करूनही संबधीतांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच / प्रेशर प्लेट / रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर / डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर समस्या  अशा अनेक  अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवाशी आणि वाहन चालक, सहाय्य्क यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या  बिघाड होऊन बंद  पडत आहेत.  या बसगाड्यांमधील  अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या या बस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यामध्ये लहान मुले, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र, अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना  रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.  वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, प्रवाशांकडून चालकांना  घडत आहेत. याबाबत अनेकवेळा बस मालकांनी संबंधितांना कळवूनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले.यावेळी,  धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार?  व्यवसायातील तोटा कोण सहन करणार ?  प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाउनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार ? ब्रेकडाऊन दरम्यान पोलिस आणि टोइंग चार्जेसचे नुकसान कोण  करणार  ?  वॉरंटीमध्ये ब्रेकडाउन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का?  कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार?प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?  असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्यात,  अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जल जीवन मिशन अंतर्गत उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी  १२ महिने गावकऱ्यांना झाले उपलब्ध – छायादेवी शिसोदे

अनिल ठाणेकर ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात विहिर स्त्रोतद्वारे उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी  १२ महिने गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ७२० योजना राबविण्यात येत आहेत. मुरबाड तालुक्यात जल जीनव मिशन अंतर्गत २०२ योजना राबविण्यात येत असून या सर्व योजना भूजलावर आधारित आहेत. मुरबाड तालुका डोंगराळ व कठिण खडकाने म्हणजे मॅसिव्ह बेसाल्ट ने व्यापलेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ यावर्षी विहिर तयार करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात काम सुरू करण्यात आले होते. या विहिरीच्या मागिल वर्षी जून अखेर या स्रोताची जमीनीपासून ९.५० मीटर स्थिर पातळी होती यंदा मे महिन्यात जमीनीपासून ५.२५ मीटर स्थिर पातळी आढळून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०० मीटर ने पाणी पातळी वाढ झाल्याने हा स्त्रोत शाश्वत झाला आहे. स्त्रोत शाश्वत करण्यासाठी पाच आढवे बोरवेल खोदण्यात आले. या कामाची दखल वेळोवेळी घेतल्यामुळे यदां उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली. सन २०११ मधील जनगणनेप्रमाणे गावातील लोकसंख्या १ हजार ७४७ असून सरासरी अंदाजे ७० हजार लिटर पाण्याची अवश्यकता असून विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहण्याचे उत्तम कामकाज ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. या कामामुळे गावकऱ्यांसाठी शाश्वत स्त्रोत उपलब्ध असणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध पाणी साठा तपासून विविध ७२० योजनाचे काम हाती घेण्यात आले आहे.  खुटल बारागावातील ग्रामस्थांना या विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहिल अशा प्रकारे काम करण्यात विभागाने यश मिळवले आहे. याठिकाणी जागा निश्चिती पासून ते कामाची सुरुवात करण्यापर्यंत विविध तांत्रिक पध्दतीने जागेची तपासणी करण्यात आली होती. यासाठी सहायक भूवैज्ञानिक सपना बोरकर, ग्रामस्थाचा प्रत्यक्ष सहभाग व वसुंधरा संस्थेच्या सहकार्यामुळे बंधारा दुरुस्तीचे काम उत्तमरित्या पुर्ण झाले आहे, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी यांनी सांगितले. चौकट विहिरीची सन २०२२-२३ मधील जून महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ९.५० मीटर स्थिर पातळी. विहिरीची सन २०२३-२४  मधील मे महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ५.२५ मीटर स्थिर पातळी. सद्यस्थितीत जमीनीपासून पाण्याची पातळी – ४:३० मीटर स्थिर पातळी.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

माथेरान : माथेरान मध्ये भारतीय जनता पार्टी आणि माधवबाग, खालापूर (मल्टिडिसिप्लिनरी कार्डीयक क्लीनिक अँड हॉस्पिटल ) यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग, रक्तदाब, व मधुमेह तपासणी शिबीराचे दि.१३ रोजी येथील कम्युनिटी…

मुंबईत हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई : मुंबईत जानेवारी-मे या कालावधीत हिवतापाचे १,६१२ रुग्ण आढळले. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हिवताप निर्मूलनासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करीत असलेले प्रयत्न अपुरे…

डॉक्टरच्या आईस्क्रीममध्ये सापडला बोटाचा तुकडा

मुंबई : मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आईस्क्रीम उत्पादकाच्या अज्ञात कर्मचाऱ्याविरूद्ध तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा…

ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी

ठाणे : शहरातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासन आणि माजी नगरसेवकांची एकत्रित बैठक बुधवारी सायंकाळी आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला भाजपाचे माजी…

 कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा मोदानीला भेट’,

ना जनसुनावणी, ना टेंडर, थेट सरकारी फर्मान – प्रा. वर्षा गायकवाड.  पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारा कुर्ल्यातील मदर डेअरीचा भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करा. मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीवर मेहरबान…

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशी सार्वजनिक रूग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन

नवी मुंबई : मुलभूत रक्तगट प्रणालीचे संशोधक आणि त्यांचे वर्गीकरण  करणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लॅंडस्टेनर यांचा 14 जून हा जन्मदिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. या…

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी दिला जाणारा आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा. घरातील मुलाप्रमाणे ग्रामपंचायतीतील बालकांना सांभाळा अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे  यांनी दिल्या.…