Month: June 2024

छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी ‘बलिदान दिवस’ म्हणून फाल्गुन अमावस्येला पाळण्यात यावा

शिवभक्त श्री राजू देसाई यांचे कळकळीचे आवाहन मुंबई : गुढीपाडव्याच्या सणासाठी श्रीखंड त्याच दिवशी आणा आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला नको. कारण तो दिवस छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी असून तमाम हिंदूंनी हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला पाहिजे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश उर्फ राजू देसाई यांनी कळकळीचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराजाभिषेक दिनानिमित्त जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळाच्या प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकसह अनेक घटना खड्या आवाजात कथन केल्या तसेच औरंगजेबाने छत्रपती शंभूराजे यांचा तब्बल चाळीस दिवस अतोनात छळ केला. शंभूराजे यांचे हात तोडण्यात आले. डोळे काढण्यात आले, शीर धडापासून वेगळे केले पण छत्रपती शंभूराजांची ना नजर झुकली, ना मान झुकली‌. हमने हमारी फौजमें कैसे कैसे सूरमा पालके रखे हैं, शाहिस्तेखान गया तो शिवाने उसकी उंगलियाॅं काटके भेज दिया, अफझलखान को शिवाने वहीं दफना दिया. हमको दुष्मन भी मिला तो शिवा जैसा और शंभू जैसा. अगले जनम में हमें शंभू जैसा शूरवीर बेटा मिले, असे औरंगजेबाने म्हटले असल्याचे खफीखान या औरंगजेबाच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, असे जेंव्हा राजू देसाई यांनी सांगितले तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. साहित्यिक विजय मडव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, मनोहर देसाई, वसंत सावंत, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, दिलीप चव्हाण, संजना वारंग, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, कांचन सार्दळ, रोहिणी चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पालघर : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक…

ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक ‘संकल्पपत्र’चे प्रकाशन

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक ॲड. परब यांना विजयी करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई : मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक संकल्पपत्राचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातोश्री’ येथे बुधवारी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असून उच्चशिक्षीत उमेदवार ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर मतदारांना यावेळी केले. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील चार जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ‘महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेना नेते ॲड. अनिल परब आहेत. संकल्पपत्र प्रकाशनावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली ५ वेळा या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विजयी होत आलेला आहे. मुंबईकर आणि शिवसेना यांचे एक दृढ नाते आहे. मुंबईतील पदवीधर मतदारांसाठी ॲड. अनिल परब यांनी विविधांगी कार्य करण्याचा संकल्प वचननाम्यात दिला आहे. शिवसेना पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत ॲड. अनिल परब यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. २६ जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान आहे. मात्र, या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे मतदान चुकवू नका. मतदान करुनच कामावर जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदवीधर मतदारांना केले. यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार म्हणून तीनवेळा विधानपरिषदेत कार्य केले. मात्र, यावेळी मी प्रथम पदवीधर मतदारसंघात उभा आहे. माझ्या संकल्पपत्राचे प्रकाशन माझे पक्षप्रमुख आणि मतदार असलेले उद्धव ठाकरे यांच्या हस्त होत असल्याचा मला मोठा आनंद आहे. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे संकल्पपत्राच्या प्रकाशनाला येथे उपस्थित आहेत. मुंबई पदविधर मतदारसंघात प्रचंड मताधिक्क्याने निवडून येण्याचा शिवसेनेचा विक्रम आहे. ९८ टक्के इतके विक्रमी मताधिक्य शिवसेनेने या मतदारसंघात मिळवलेले आहे. यावेळीसुद्धा मोठे मताधिक्य घेत मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहील, असा ठाम विश्वास ॲड. अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे ॲड. अनिल परब यांच्या विरोधात मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे डॉ. दिपक सावंत की भाजपचे किरण शेलार उमेदवार असणार आहेत, याविषयी अद्याप काहीच निश्चितता नाही. परब यांचे संकल्पपत्र दोन पानी असून ते मराठी व इंग्रजीमध्ये आहे. त्यामध्ये ॲड. अनिल परब यांनी आपला परिचय दिलेला असून त्यामध्ये मुंबईतील पदवीधरांसाठी हेल्प डेस्क ते वसतीगृह सुविधा असे नियोजित कामांची सविस्तर यादी येथे दिलेली आहे.

डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अपघातात एका महिलेचाही सामावेश ठाणे : वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते (४४) यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या…

‘काहींनी जाहीरपणे नाही पण मैत्री निभावली’

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची समाज माध्यमावर पोस्ट  समाजमध्यमांवरील संदेशामुळे खळबळ ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

पिकवलेला भाजीपाला ‘ई कार्ट’द्वारे घरपोच

ठाणे : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी कृषी विभागाच्या मार्फत महिला बचत गटांना ‘ई – कार्ट’ पुरविण्यात आले आहेत. या वाहनाच्या मदतीने महिलांना स्वत: पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री थेट…

नेरुळ विभागात अनधिकृत हॉटेलवर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रांर्तगत महात्मा गांधीनगर (एम.आय.डी.सी.) डी – ब्लॉक मधील पाण्याच्या पाईपलाईन लगत असलेल्या सर्व अनधिकृत हॉटेलवर नेरूळ विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण विरोधी पथकाने…

शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती

नवी मुंबई :  भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा…

आमदार निरंजन डावखरेंना पाठिंबा

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मानले आभार ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निरंजन डावखरे यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच त्यांना पाठिंब्याचे पत्र सोपविले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, सरचिटणीस सुशिल महाडिक, उपाध्यक्ष सचिन बनसोडे, कोकण प्रदेशाध्यक्ष यशपाल ओहोळ, जिल्हाध्यक्ष धम्मदिप बनसोडे, प्रतिक सुताके, महेंद्र चंदनशिवे, धर्मराज ब्राम्हणे, अश्विन वाघ आदी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळविण्याचा निर्धार विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी कंबर कसली

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा नगरपासून सुरू होणार. मुंबई दि. १२ जून – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिनांक १९, २०, २१ जून रोजी अहमदनगर इथून राज्यव्यापी दौऱ्याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. शिवाय नगर जिल्ह्यातील नगर शहर, कोपरगाव, अकोले या विधानसभा मतदारसंघात, शिवाय लोकसभा दक्षिणनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावाही सुनिल तटकरे घेणार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनात सुरुवातीचा लोकसभा सदस्य म्हणून जी शपथ घ्यावी लागेल तो कालावधी सोडता उर्वरित कालावधी महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करुन ज्या – ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत त्या मतदारसंघाचा संघटनेचा व्यापक दौरा करण्याचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या दौऱ्याची घोषणा आज सुनिल तटकरे यांनी केली. ४० वर्षात लोकसभा निवडणुका जवळून पाहिल्या आणि लढल्या आहेत. पाचवेळा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो आहे असे सांगतानाच प्रत्येक निवडणूक एक वेगळे परिमाण घेऊन येत असते. २००४, २००९, २०१४,२०२४ ची निवडणूक असेल या निवडणुकीची वेगळी समीकरणे राहिली आहेत. तर विधानसभेलाही वेगळी समीकरणे पहायला मिळाली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात आलेले जे कौल बघितले तर महायुतीला जे अपेक्षित यश अभिप्रेत होते. ते आम्ही मिळवू शकलो नाही. हे निर्विवाद सत्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज या निवडणुकीत आमच्यापासून दूर गेलेला दिसला. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मतदान होत असते आणि विधानसभेला वेगळे होत असते. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणाने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत असे सुतोवाचही सुनिल तटकरे यांनी केले. गेले सात – आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याबाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती बोलण्यात आली. ती असू शकते ते नाकारत नाही ती निवडणूकीपूरती सिमीत असते असेही सांगताना सन १९८४, १९८९,१९९०, १९९१, १९९५, १९९६, १९९८, अशा कालावधीत कसे चित्र बदललेले दिसले हा अनुभवही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितला. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे फार कुणी आत्मविश्वास गमावलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यव्यापी संघटनेचा दौरा करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजितदादा पवार यांच्या राज्यव्यापी दौर्‍याचे नियोजन करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली की,  निवडणूकांची तारीख जशी जवळ आली तसा अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो असे स्पष्ट करतानाच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. नगरला जो काहींचा वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर, वकील जितेंद्र आव्हाड यांचे भाषण ऐकले, त्यांनी चारवेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवले असे वक्तव्य केले. जे आम्ही सांगत आलो तेच म्हणजे २०१४, २०१६, २०२२ मध्ये भाजपसोबत जायचे हे ठरले होते त्यावर शिक्कामोर्तब डॉक्टरांनी केले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले. जयंत पाटील हे गेली सहा वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना व्यासपीठावरुन मी फक्त चार महिने आहे हे सांगावे लागले. तुम्ही चार महिने सोशल मीडियावर बोलू नका हेही सांगावे लागले. चार महिन्यानंतर अध्यक्ष पद सोडणार आहे. निवडणूकीच्या यशानंतर एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला या पध्दतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात हे कशाचे द्योतक आहे.म्हणून काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड मारु नये असा खरमरीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. आता महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अविरत २४ तास राबणाऱ्या अजितदादांच्या पाठीशी सहानुभूती तयार होईल आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे उपस्थित होते. 0000 Photo-6 मुख्यमंत्र्यांच्या मंजूर निधीतील कामांचा प्रताप सरनाईक लावणार धडाका ! अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार आहेत. विधानसभेच्या आचारसंहितेनंतर २६ जून २०२४ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापुर्वीची काही कामे थांबलेली असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवरून  सोमवारी, १० जून, २०२४ रोजी आमदार  प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन २६ जून रोजी आचारसंहिता संपल्याबरोबर व ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामे पुर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांही संबंधित सर्व अधिकार्यांना प्रशासकीय स्तरावर असलेल्या सर्व मंजूर्या तात्काळ मंजूर करण्याच्या सुचना केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील खालील कामांविषयी चर्चा झाली. १)ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील माजिवडा, मोघरपाडा, वाघबीळ, येऊर, रामबाग येथील स्मशानभुमीचे अद्ययावत पध्दतीने नुतनीकरण / सुशोभिकरण करणे.…