Month: June 2024

घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू !

ठाणे: घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या…

ठाणे स्थानकाच्या बाहेर कचऱ्याचा ढीग !

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म करा. २ च्या विश्रांती कक्षाच्या बाहेर कचरा आणि रेती व खाडी च्या रोड्याने भरलेल्या गोण्यांचे  ढीग तसेच पडलेले आहे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाहेर  कचऱयाच्या ढिगाचे रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्या लगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनीठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.…

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 13 उमेदवार रिंगणात

 उमेदवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक 7 जून, 2024 पर्यंत स्वीकारण्यात आलेल्या एकूण 25 अर्ज नामनिर्देशनपत्रांची  छाननी झाल्यानंतर 12 अर्ज नामनिर्देशन मागे घेण्यात आले असून निवडणूकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.  अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा.भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे.  नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत  छाननी दरम्यान एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात  आले होते.  कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून   1) ॲङ घोन्साल्वीस जिमीम मॅतेस 2) निलिमा निरंजन डावखरे  3) केदार शिवकुमार काळे 4)  संजय भाऊराव मोरे 5) अस्मा जावेद चिखलेकर, 6) डॉ.प्रकाश पाडूरंग भांगरथ 7) अंकिता कुलदीप वर्तक, 8) अमित जयसिंग सारिया 9) किशोर ओतरमल जैन, 10) डॉ.भगवान अभिमानसिंग रजपूत 11) प्रा.राजेश संभाजी सोनावणे, 12) अमोल रतन गौतम जगताप असे एकूण 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13 झाली आहे. ते पुढील प्रमाणे  1) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस 2) डावखरे निरंजन वसंत, भारतीय जनता पार्टी 3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  4) अमोल अनंत पवार, अपक्ष  5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष 6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष 7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष  9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष  10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष 11)  मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष 12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष 13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती,अपक्ष असे आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार 26  जून 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.  अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) अमोल यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 000000

आठ दिवसांत अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू

भाजपा माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा इशारा रोहिणी दिवाण ठाणे : घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर ही ठाणे महापालिका प्रशासनाचे ठाण्यात ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.  शहरात एखादी दुर्घटना घडून निरपराध माणसांचे जीव गमावण्याची हे सुस्त प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहेत. ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि घाटकोपर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्वरीत शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा महापालिकेच्या समोर  तीव्र  आंदोलन करण्याचा सज्जड इशारा भाजपाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.  आज ठामपा समोर. अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले.त्या वेळी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. ठामपा बरखास्त होऊन तीन वर्षे लोटली असून सध्या महापालिकेचा कारभार प्रशासन हाकत आहे.  परंतू तत्पूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आपण  शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज संख्या बाबत माहिती विचारली असता  अधिकृत होर्डिंग्जची संख्या ५९६ असल्याचे  सांगण्यात आले होते.तर अनधिकृत होर्डिंग्ज बाबत  कोणतीही मोजणी झाली नसल्याची माहिती  दिल्यानंतर माजी महापौरांनी त्वरीत मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. परंतू  पाच वर्षांनंतरही सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणतीही मोजणी केली नसून  कोणाच्या आशिर्वादाने ठाणे शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप केले जात आहे,असा संतप्त सवाल माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. तरी  घाटकोपर होर्डिंग्ज सारखी दुर्घटना होण्यापूर्वी  अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्वरीत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात यावी नाही तर  महापालिका समोर  तीव्र आंदोलन करू असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या- एकनाथ शिंदे

 अशोक गायकवाड मुंबई:तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत…

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ

रायगड : विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

विदयार्थ्यांकडुन ॲडमिशन, इमारत निधी, डोनेशनच्या माध्यमातून कोटींची लुटमार

अशोक गायकवाड कर्जत : कर्जतधील सरकारी, निमसरकारी, खाजगी शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कॉलेज यांचेकडे इमारत निधी व ॲडमिशन शुल्कवाढीचा हिशोब प्रत्येक पालकाने माहितीच्या अधिकाराने घ्यावा, असे मत ॲड. कैलास मोरे, राज्य प्रवक्ता सम्यक विदयार्थी आंदोलन यांनी व्यक्त केले आहे. १० वी व १२ वी चे निकाल लागले त्यानंतर पुढील प्रवेश प्रकीया सुरू आहे. कर्जतमधील अनेक शाळा / कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करीत आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ तसेच फी घेणेसंदर्भातील इतर कायदयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अशा शाळा/कॉलेजनी विदयार्थ्यांकडुन नियमानुसार प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत. परंतु अनेक शाळा/कॉलेज कायदयाचे व नियमांचे पालन न करता विदयार्थ्यांकडून भरमसाठ इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत आहेत. सदरची बाब विदयार्थ्यावर अन्यायकारक आहे.माझेकडे अनेक विद्यार्थी १० व १२ वीचे पुढील अॅडमिशन प्रकीयेसाठी आले असता अनेक विद्यार्थ्यांची फी मी कमी केली आहे. परंतु हे करत असताना एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, शाळा/कॉलेज च्या मनमानी कारभाराविरुद्ध शासन/प्रशासन कुणाचेच लक्ष नाही? शिक्षण हा मानवाच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच शिक्षणाचं बाजारीकरण झाले आहे. आणि यावर कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही. तसेच ही लुटमार सर्व सामान्य उघड्या डोळ्याने पाहत आहे. ही खुप खेदाची गोष्ट आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून ह्या संस्था/संचालक पैशाने गबर झाले आहेत. त्यांचा हिशोब घेणेचा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील ज्या अनुदानित/ विनाअनुदानित खाजगी शाळा/ कॉलेज असतील त्या प्रत्येक शाळा/कॉलेज मध्ये माहितीच्या अधिकारात खालील माहिती विचारा. १. मागील ५ वर्षात इमारत निधी व अॅडमिशन शुल्क अशी किती रक्कम संस्थेकडे जमा झाली व खर्च झाली? २. इमारत निधी व प्रवेश शुल्क ठरवताना आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली का? ३. इमारत निधी व प्रवेश शुल्क निश्चित करताना शासनाची परवाणगी घेतली का? ४. दरवर्षी इमारती निधीच्या नावाखाली घेतलेल्या पैशातून किती इमारती बांधल्या? ५. संस्थेला आलेल्या डोनेशनची माहिती ? ६. मागील ….वर्षात दरवर्षी खरेदी केलेल्या जमिन मालमत्तांची तपशीलवार माहिती ? ७. गेल्या ५ वर्षाचा संस्थेचा ऑडीट. ८. संस्थेची घटना व माहिती.ही माहिती सर्व पालकांनी तसेच सर्व सामान्य नागरीकांनी आपल्या परिसरातील शाळा/कॉलेजकडे मागावी तरचं शिक्षणाच्याबाजारीकरणाला आळा बसेल अन्यथा सर्वसामान्यांची लुटमार होतंच राहील.असा इशारा ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

अस्तान येथे दरड कोसळली

खेड : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलनामुळे दरड कोसळून रस्तावर आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. तब्बल १२ तासांनी रस्त्यावरील माती हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. १८ गाव…

नीट परिक्षाच रद्द करा- पटोले

मुंबई : नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे आणि ही परिक्षाच रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नीट परिक्षेत घोटाळा झालेला…