Month: June 2024

बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४ –२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.…

फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाच्या वर्तनाबाबतचा अहवाल सादर करा

 उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश   मुंबई : आईची हत्या करून तिचे अवयव भाजून खाल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाचा मानसिक आणि मानसशास्त्रीय अहवाल तसेच त्याच्या वर्तनाबाबतचा प्रोबेशन अधिकाऱ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुनील कुचकोरवी याला आईची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी २०२१ मध्ये कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल आहे. याशिवाय, सुनील यानेही शिक्षेविरोधात अपील दाखल केले आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, २८ ऑगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर शहर येथील माकडवाला वसाहतीत आईसह राहणाऱ्या सुनील याने तिची निर्घृण हत्या केली. नंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तव्यावर भाजून खाल्ले. सुनील याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी झाली होती.

ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली

एक वृद्ध जखमी     ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक दोन जवळ रेल्वेच्या २० फूट उंच संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वृद्ध जखमी झाले. नरेंद्र कोळी (६२) असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वीच ही भिंत बांधली होती. जमीन खचल्याने ही भिंतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच रुळांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक दोनजवळील कोळीवाडा भागात भिंत उभारली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या भिंतीचा ६० फूट लांब आणि २० फूट उंच भाग कोसळला. याच दरम्यान, नरेंद्र कोळी हे या भागातून जात होते. कोळी या घटनेत जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिका, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी उभारली आहे. जमीन खचल्याने ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 00000

सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे शहरातील बेकायदेशीर

पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई   ठाणे : ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही…

कल्याण- डोंबिवलीत बीअरबार, मद्य विक्रीचे परवाने देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी बीअरबार, मद्य विक्रीची दुकाने अनधिकृत इमारतीत सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.…

नेरूळ सेक्टर 15 येथील फकिरा मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व उपआयुक्त डॉ. अजय गडदे…

माझा प्रभाग माझी जिम्मेदारी

ठाणे : कोपरी पूर्व च्या शिवसेना विधानसभा संघटिका सौं.मालती रमाकांत पाटील ( मा. नगरसेविका ) यांच्या अथांग प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 20 (अ) शांतीनगर कोपरी ठाणे पूर्व येथे नव्याने नूतनीकरण करण्यात…

पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळाची स्थापना करा

ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांची मागणी   मुंबई : न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या आर्थिक, राजकीय,…

मुरबाडच्या कातकरीवाडीत रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

राजीव चंदने   मुरबाड: तालुक्यातील धसई नजीकच्या ओजिवले गाव येथील कातकरीवाडीपर्यंत पोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कातकरीवाडीतील…

अजय जेया यांच्या जनजागृती अभियानाचा, ठाणे वाहतूक शाखेने घेतला धसका…

टोइंग व्हॅनच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली तूर्तास बंद!     ठाणे : ठाणे शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अजय जेया हे, सुमारे वर्षभरापासून टोइंगच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार, लोकांसमोर मांडत आलेले…