Month: June 2024

रुग्णालयातील सोयीसुविधा, औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही – सौरभ राव

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील  उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधिक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव  यांनी दिले.रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांची घेतली सदिच्छा भेट.

जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्र्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटले !

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे डाॅ. श्रीकांत शिंदे हे निवडणूक जिंकले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटलेले आढळून आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार व मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डाॅ श्रीकांत शिंदे हे ५ लाख ८७ हजार ९२१ मते मिळवून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली राणे-दरेकर यांना ३ लाख ७९ हजार २३६ मते मिळाली. म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना दरेकर यांच्यापेक्षा २ लाख ८ हजार ६८५ मते अधिक मिळून ते निवडून आले. पण आमदार जितेंद्र आव्हाड प्रतिनिधीत्व करत असलेल्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात मात्र वैशाली दरेकर यांना १ लाख ३५ हजार ४९६ मते मिळाली तर श्रीकांत शिंदे यांना अवघी ६९ हजार ९८८ मते मिळाली. म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा ६५ हजार ५११ चे मताधिक्य मिळवून दिली. अंबरनाथमध्ये ३५ हजार ६४२, उल्हासनगरमध्ये ५४ हजार ७५७, कल्याण पूर्व ३२ हजार ५९६, डोंबिवली ६५ हजार २०३, कल्याण ग्रामीण ८६ हजार २९५ या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. कळवा मुंब्र्यात राहूल गांधी यांची झालेली दुसरी भारत यात्रा, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा रोड शो, शरद पवार यांनी घेतलेली सभा महत्वाचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली मेहनत या सर्वांचा परिणाम  वैशाली दरेकर यांचे मताधिक्य वाढण्यात तर श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटण्यात झाले आहे.

खासदार नरेश म्हस्के अॅक्शन मोडवर 

ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी राडारोडावरून रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर ठाणे : दनवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडेल्या राडारोडावरुन खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहर  शहरप्रमुख  हेमंत पवार, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत पाटील, ठाणे मनपा परिवहन समिती सभापती विलास जोशी, योगेश जानकर, पवन कदम, विभाग प्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती, युवा सेनेचे नितीन लांडगे, निखिल बुजबुडे, स्टेशन मास्तर केशव तावडे आदी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक १, २ आणि ५ ची पाहणी केली. तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसाळ्याचे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. रेल्वे प्रवाशांशी दौऱ्या दरम्यान नरेश म्हस्के संवाद साधला. प्रवासी प्रतिक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या. फलाटांवरील पाणपोई, शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली. फलाटांवर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

नवी मुंबई सानपाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई सानपाडा येथे कै.  सिताराम मास्तर उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  ५ जून हा  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्डचे विभाग अधिकारी(उपायुक्त) भरत धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.    याप्रसंगी वसुंधरेची शपथ घेण्यात आली. ५ जुन हा  पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या वृक्षारोपण प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  पर्यावरण दिनाचे महत्त्व फार मोठे आहे. आज भारतात  ५३ टक्के तापमान वाढीचे प्रमाण पोहोचले आहे. ही बॉर्डर लाईन असून धोक्याची घंटा आहे.   तापमान ५६ टक्के  गेल्यावर मनुष्य हानी होऊ शकते. कोरोनानंतर आपण काही शिकलो नाही.  त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे. विदर्भ व मराठवाड्यात वृक्षारोपण न  झाल्यामुळे तापमानवाढीने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे. राजस्थानमध्ये  बीएसएफचे जवानानी २५  सेकंदात पापड भाजून  काढले. हा व्हिडीओ आज जगभर व्हाट्सअप वर फिरत आहे.  आफ्रिकेची राजधानी केपटाऊन ही  २०१३  पासून वॉटरलेस झाली असून मिलेटरी व पोलीस संरक्षणामध्ये प्रत्येकाला २५  लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. याचा अर्थ तपमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आज भारताला ५००  कोटी झाडे लावण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाच झाडे जरी  लावली तरी पर्यावरणाचे संरक्षण होईल व भारतातील नागरिकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळेल. आज झालेल्या पर्यावरण दिन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, सावंत,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव मारुती विश्वासराव,  सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ – म.स.पास्कर

अशोक गायकवाड नवी मुंबई,:महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, २६ जून  रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ०७.०० ते सायं ६.०० ही नवीन वेळ निश्चित करण्यात…

पनवेलमधून मताधिक्य दिल्याबद्दल श्रीरंग बारणे यांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांचे आभार

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, रुपेश नागवेकर आदी उपस्थित होते.

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ ; महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना दिला.

कांबळे, गोळे, सोनार, राऊत ठरले सर्वोत्तम लिफ्टर

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : नुकत्याच परळ येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मुलांमध्ये कोल्हापूरच्या शामसुंदर कांबळे व मुलींमध्ये मुंबई उपनगरची हर्षदा गोळे व सब ज्युनिअरमध्ये मुंबई उपनगरचा क्रिश सोनार व पुण्याची कादंबरी राऊत यांनी स्ट्रॉंग वुमन व स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उदय देशपांडे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अरुण केदार, छत्रपती पुरस्कार प्राप्त, सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीस समारंभ ॲड. प्रवीण शिंदे, सेक्रेटरी,जीएसटी असोसिएशन, ॲड. दत्तात्रेय उतेकर व संजय नारकर, सरचिटणीस ऑल इंडिया ज्युनिअर जीएसटी ऑफिसर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेचा निकाल (विजेते खेळाडू) ज्युनिअर पुरुष ५३ किलो – विराज पावसकर, (मुंबई उपनगर), ५९ किलो – वैभव जाधव, (मुंबई उपनगर), ६६ किलो – पार्थ तारे, (पालघर), ७४ किलो – श्यामसुंदर कांबळे, (कोल्हापूर), ८३ किलो – ओमकार भगत, (ठाणे),  ९३ किलो – नवाज खान (मुंबई उपनगर), १०५ किलो – रोशन गावकर, (मुंबई), १२० किलो – हर्षल पाटील, (कोल्हापूर), १२० + – सुमित जाधव,(कोल्हापूर) ज्युनियर महिला ४३ किलो – मानसी हांडे, (मुंबई उपनगर), ४७ किलो – हर्षदा घोले, (मुंबई उपनगर) ५७ किलो – शुभांगी पाटील, (कोल्हापूर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), ६९ किलो – प्रेरणा साळवी, (ठाणे), ७६ किलो – सेजल मोईकर, (पुणे), ८४ किलो – प्रतिभा लोणे, (ठाणे), ८४+ किलो – अनुष्का खोपीकर, (पुणे) सब ज्युनिअर महिला ४३ किलो – गायत्री बडेकर,…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हजार झाडे लावून अभियानाला सुरूवात

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानातंर्गत १५ ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावणार  –  आयुक्त सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी पोखरण रस्ता क्र्.१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, ०५ जूनपासून १५ ऑगस्ट २०२४पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत एक लाख झाडे लावण्याचे  ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५००० झाडे लावून करण्यात आली आहे. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्याने  ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली. या अभियानात एकेका विभागाचे पालकत्व महापालिकेच्या एकेका विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडे लावण्यात आली. वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुर्तफा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडे यांची माहिती उपस्थितांना दिली. झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनीलगतच्या फुटपाथच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासह, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान विभाग) सचिन पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदींनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. त्याचबरोबर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. कमी जागेत, कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी येथे वृक्षारोपण झाली.