डोंबिवली: गेल्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि पोलिसांनी बेकायदा प्रतिबंंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या, बेकायदा डान्स बार, लेडिज बारवर कारवाई सुरू केली आहे. पालिका आणि पोलिसांनी आता कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात उघड्यावर विदेशी, गावठी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे हनुमान मंदिरा जवळील चक्की आणि किराणा दुकानाशेजारील भोईर सदन इमारतीच्या पाठीमागील बाजूस मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ मच्या हा दारू विक्रेता खुलेआमपणे विदेशी दारू आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत विकतो. याठिकाणी स्वस्तात विदेशी दारू पिण्यास मिळते म्हणून डोंबिवली शहराच्या विविध भागातील नागरिक याठिकाणी मद्य पिण्यासाठी येतात.
हे नागरिक मद्य पिऊन धुंद झाले की या दारू अड्ड्याच्या भागात ओरडा करत, एकमेकांशी भांडण करत बसतात. रात्रभर हा ओरडा दारूड्यांचा सुरू असल्याने हनुमान मंदिर भागातील त्रस्त आहेत. या दारू अड्ड्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर विष्णुनगर पोलीस ठाणे आहे. यापूर्वी कधीच पोलिसांनी या दारू अड्ड्यावर कारव्ई केलेली नाही, असे स्थानिक रहिवासी सांंगतात. दारू पिऊन काही जण याच भागात पडतात. दारू अड्ड्याच्या सभोवतालच्या इमारतींंलगत ते लघुशंका करत असल्याने या भागात दुर्गंंघी पसरते. शाळकरी मुले, महिला, पालक या रस्त्याने जातात. त्यांनाही या दारूड्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
विष्णुनगर पोलिसांंनी या दारू अड्ड्यावर छापा टाकून दुकान मालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शासनाचा कर बुडवून विदेशी दारू मच्छिंद्र पाटील विकत असल्याने उत्पादन शुल्क विभागानेही या कारवाईत पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अधिक माहितीसाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
तिसगाव येथे अड्डा
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्यावरील पदपथावर एक चायनिज खाद्य पदार्थ विक्रीसाठी हातगाडी आहे. या हातगाडीवर रात्रीच्या वेळेत दारूची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांंनी केल्या आहेत. चायनिज विकणारे अनेक हातगाडी चालक चायनिज हातगाडीच्या पाठीमागील बाजूस दारू विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशाचप्रकारची विक्री तिसगाव येथे पदपथावर सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेने रात्रीच्या वेळेत रस्त्यांवर, रेल्वे स्थानक भागात चालविण्यात येणाऱ्या चायनिज हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *