मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेला जनाधार पाहता सुखवलेल्या काँग्रेसचे मनोबल आणखी उंचावले आहे. काँग्रेसने कुलाबा विधानसभा मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले असून कुलाब्यातून नामांकित कायदेतज्ज्ञ ॲड. रवी प्रकाश जाधव यांना मैदानात उतरविण्याचा जवळपास निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुलाबा विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अनेक वर्ष कुलाबा मतदार संघातून ॲनी शेखर निवडून येत होत्या. आता कुलाबा विधानसभा भाजपकडे आहे. काँग्रेसने आता पासूनच कुलाबा विधानसभा मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कुलाबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस नवीन चेहरा मतदारांसमोर आणत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष ॲड रवी प्रकाश जाधव यांना मतदारांशी संपर्क साधण्याचे तसेच मतदारांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले आहे.ॲड रवी प्रकाश जाधव हे मुंबई सत्र आणि दिवणी न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनखाली आज कुलाबा येथे गरजू विद्यार्थ्यासाठी मोफत वही आणि छत्री वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही आणि छत्री वाटप करण्यात आहे. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी महायुती सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका केली. वही आणि पुस्तकाच्या खरेदीवर सरकारने जीएसटी लावल्याने विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके खरेदी करणे अवघड झाले आहे. कुलाब्यातील शाळाची दूरवस्था झाली आहे. पण सरकारला त्याचे काहीही पडलेले नाही, फक्त सरकारला लक्ष्मीदर्शन हवे आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
या कार्यक्रमाला आमदार राजेश राठोड, आमदार वजाहत मिर्झा, लहू कानडे, तसेच कुलाबा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
00000
