ठाणे : प्रदिर्घ काळ प्रशासकीय कामकाजात मोलाचा वाटा कर्मचारी व अधिकारी देत असून जिल्हा परिषदेमार्फत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्त होणाऱ्या दिवशी सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात येईल यासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सर्व विभाग कामकाज करत आहेत. सेवानिवृत्त होताना आनंदाने सेवेतून निवृत्त व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत, असे मत या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद ठाणे च्या वतीने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने जून महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांच्या शुभहस्ते ३१ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जून महिन्यात जिल्हा परिषदेचे एकूण 31 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार , उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित तसेच सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विभाग प्राथमिक २४, सामान्य प्रशासन २, आरोग्य विभाग १, बांधकाम विभाग २, लघुपाटबंधारे विभाग १, ग्रामपंचायत विभाग १ असे जिल्हा परिषदेचे एकूण ३१ अधिकारी व कर्मचारी जून महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, वरिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहाय्यक, शाखा अभियंता, मैलकामगार, ऑईलमन या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.
00000