अशोक गायकवाड

 

 

रायगड : उपविभागीय अधिकारी महाड डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार, (दि.२८) सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्याचे दृष्टीने शुक्रवारी महाड तालुक्यामध्ये दादली पूल नजीक सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी महाड डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली नगर परिषद , महसूल, पोलीस तसेच इतर संबंधित विभाग यांचे सह आपदामित्र यांनी यशस्वीरीत्या प्रात्यक्षिक आयोजित केले. मान्सूनसाठी देण्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कडून दरडप्रवण गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांमध्ये पाऊस व अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क राहण्यावाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. महाड व परिसरामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच यापूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर दरड,अतिवृष्टी व पूरस्थितीप्रसंगी बचावासाठी जनजागृती व प्रात्यक्षिकाद्वारे पूर्वतयारी केली जात आहे. महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधून एनडीआरएफच्या पथकाने आपल्या भेटी सुरू केल्या असून शहराजवळ असलेल्या चांभारखिंड व विविध गावात एनडीआरएफ पथकाने भेट दिली. दरडग्रस्त गावात भेट देऊन गावातील नागरिक व शासकीय कर्मचारी यांच्याबरोबर संभाव्य असणाऱ्या धोक्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. यातील काही जवानांनी मागील वर्षे महाडमध्ये मदत कार्यात काम केले आहे. या एनडीआरएफच्या पथकामध्ये कमांडंट निरीक्षक दिलीप कुमार सह ३१ जण असून २८ पुरुष व दोन महिला जवान देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *