नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या अनुषंगाने ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान नागरिकांच्या सहभागातमन संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज नमुंमपा आयुकत् डॉ. कैलास शिंदे यांचय मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त् श्री. सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत नेरुळ विभागाचे सहा.आयुकत् तथा विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंद व स्वच्छता मित्रांसह सक्रीय सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
यामध्ये महाविदयालयीन एनएसएस विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, स्थानिक रीक्षा ड्रायव्हर तसेच नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. प्लास्टिक बॉटल्स, रॅपर्स, प्लास्टिक, थर्माकोल व कागदाचे तुकडे अशा प्रकारचा कचरा जमा करुन नेरुळ रेल्वे स्टेशनचा परिसर साफ करण्यात आला. यामध्ये एकूण 50 गोणी कचरा जमा करण्यात आला.
०००००