मुंबई, ता. ३० : सहकारी पतसंस्थांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळात शनिवारी केली.
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत दरेकर म्हणाले की, बेरोजगारी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही प्रथम क्रमांकावर आहे. अनेक सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून १० ते १५ लाख रोजगार निर्माण होतील. गुंतवणुकीच्या माध्यमातून औद्योगिकीकरण वाढले पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे.कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कधी नव्हे एवढी कौशल्य विकास केंद्रे तयार झाली आहेत. त्यांच्यामार्फत प्रशिक्षण दिले आहे. ५००च्या वर प्रमोद महाजन विकास केंद्रे तयार झाली आहेत. त्यामार्फत हजारो नोकऱ्या दिल्या आहेत. वेगवेगळ्या महामंडळांतून रोजगारनिर्मिती होत आहे. हे सरकार खऱ्या अर्थाने बेरोजगारीवर काम करत असल्याचे दरेकरांनी म्हटले.
00000