मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री ‘ माझी लाडकी बहिण ‘ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून वय वर्ष 21 ते 60 दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याला आजपासून सुरुवात झाली असून जिल्हाभरातील सर्वच सेतू व तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी उसळलेली पहायला मिळाली आहे..नाशिकच्या मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयात सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी लगाणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली..या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवाशी दाखला, उत्त्पन्न दाखलासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत.