वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले – रामेश्वर पाचे

 

ठाणे : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले आहे, असे मत यावेळी कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी व्यक्त केले.
कृषी दिनानिमित्त प्रथम सर्वांना खूप शुभेच्छा. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले आहे. त्याचे योगदान शेतकऱ्यांना काम करण्यासाठी व आधुनिकतेचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे आज शेतातील बांधावर देखील कृषी दिन साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांना अभिवादन करतो असे प्रतिपादन या प्रसंगी कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *