ठाणे, ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्य सावरकरनगर, नौपाडा कोपरी, मुंब्रा, दिवा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी कारवाई करण्यात आली. या सर्व प्रभाग समितीअंतर्गत मिळून एकूण 88.60 किलो सिंगल यूज्‍ प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 57 हजार 200 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
वागळे इस्टेट व लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमिती अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 75 आस्थापनांना भेटी देवून एकूण 40.30 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन 18 हजार 700रु इतका दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 40 आस्थापनांना भेटी देवून एकूण 20 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 21 हजार 500 रु इतका दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत 25 आस्थापनांना भेटी देवून एकूण 10.30 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. यापोटी एकूण 5 हजार रु. इतका दंड वसूल करण्यात आला. दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात 25 आस्थापनांना भेटी देवून 18 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 12 हजार रु इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशान्वये उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, सुनील जगताप, पंकज साळवे, संजय साळवी, अमित मोते आदींनी केली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमितीअंतर्गत प्रतिबंधीत प्लॅस्टिकबंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *