ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी त्यांचे प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व महापालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.