मुरबाड : भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशा नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून सदर कायद्यांबाबत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती अनुषंगाने मुरबाड पोलीस ठाणे हद्दीत कार्यक्रम घेण्यात आले.
नवीन कायदा जनजागृती अनषंगाने मुरबाड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या उपस्थितीत मुरबाड पोलीस ठाणे हद्दीतील न्यू इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद विद्यालय येथे प्रत्यक्ष भेट करत शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत नवीन कायद्यासंदर्भात चर्चासत्रांचे आयोजन केले होते सदर चर्चासत्रांमध्ये दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पासून भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सुरक्षा आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांसदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच लहान मुले व महिलांविरुद्धचे गुन्हे याबाबत माहीती देऊन जनजागृती केली. मुरबाड, सोनारपाडा, देवगांव, घुटयाचीवाडी, परीसरातील सर्व रिक्षाचालक/मालक यांची तीन हात नाका चौकी येथे एकत्रित मिटींग घेऊन नवीन कायद्यांसदर्भात माहीती देऊन योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच मुरबाड पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये भेट देऊन गावातील प्रतिष्ठित नागरीक, शांतता कमिटी, एमआयडीसीतील कंपनी कर्मचारी, व्यावसायिक, तरुण मुले व इतर ग्रामस्थ यांची मिटींग घेतली गेली नवीन भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांसंदर्भात स्थानिक पातळीवर प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे.
000
