आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले सभागृहात गंभीर प्रश्न
अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : पाण्याचा प्रश्न हा आमच्या कळवा मुंब्र्यात गंभीर आहे.माझ्या मतदारसंघात तर व्हॉल्वमन ला हाताशी धरून नागरिकांना पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात तसेच नवीमुंबईतील स्थानिक, गरिब नागरिकांना एसआरए योजनेपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे, असे प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात उपस्थित केले.
पाण्याचा प्रश्न हा आमच्या कळवा मुंब्र्यात गंभीर आहे.माझ्या मतदारसंघात तर व्हॉल्वमन ला हाताशी धरून नागरिकांना पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात.हा प्रश्न आज सभागृहात मांडला आणि यावर होणाऱ्या मीटिंग साठी कळवा मुंब्राचा प्रतिनिधी म्हणून मला बोलावण्यात यावे, अशी विनंतीवजा मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाणी प्रश्नावर सभागृहातील चर्चेवर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना केली.
नवी मुंबई गावठानाच्या सिमांकानाचा प्रश्न हा अनेक वर्ष प्रलंबित आहे.मूळ गावकऱ्यांचा सर्वात जास्त तोटा हा या प्रश्नांमुळे झाला आहे.”हे सिमांकन वाढवून देऊ”, असा शब्द तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता.यासंदर्भात अनेक बैठका देखील झाल्या होत्या.परंतु आजपर्यंत यावर कोणताही निर्णय झाला नाही. थोडक्यात स्थानिक गरिब नागरिकांना एसआरए योजनेपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे, असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सभागृहात बोलताना उपस्थित केला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *